'या' टर्किश डेजर्टची चवच न्यारी; एकदा खाल तर म्हणालं लय भारी Video

Last Updated:

हा पदार्थ एक टर्किश डेजर्ट असून खायला मुंबईकरांची मोठी पसंती मिळतेय.

+
News18

News18

मुंबई, 10 ऑक्टोबर: आजवर अनेक प्रकारच्या देसी-परदेसी पदार्थांचा आस्वाद तुम्ही घेतला असाल. त्यात गोडाधोडाचे पदार्थ म्हणजेच गुलाबजाम, बर्फी, पेढा, रसगुल्ला हे आता साधारण झाले आहेत. त्यामुळे खवय्ये आता निरनिराळे विदेशी डेजर्ट खाण्यास पसंती देत आहेत. मुंबईतील मुलुंडच्या अशाच एका कॅफेमध्ये मिळत आहे एक चविष्ट विदेशी गोड पदार्थ. हा पदार्थ एक टर्किश डेजर्ट असून खायला मुंबईकरांची मोठी पसंती मिळतेय.
मुंबईतील मुलुंडच्या देवी दयाल रोड परिसरात असलेले टेस्टिलियस नामक फूड कॅफेमध्ये एक टर्कीस पदार्थ मिळत आहे. संजय जैन टेस्टिलियस कॅफेचे मालक आहेत. या टर्कीश डेझर्टला कुनाफा असे देखील म्हटले जाते. या पदार्थाला टर्की या देशात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. तसेच आता मुंबईतील खवय्ये देखील या पदार्थाचा आस्वाद घेताना दिसून येत आहे. 
advertisement
 कुनाफा एक मिडल इस्टमधील पदार्थ आहे. टर्की देशात सर्वात जास्त विकला जाणारा हा खाद्यपदार्थ आता भारतातही खवय्यांची मन जिंकत आहे. कुनाफा तयार करण्याची पद्धत ही तशी सोपी आहे. हा कुनाफा प्रकार एका विशिष्ट भांड्यांत तयार केला जातो. हा कुनाफा पदार्थ त्यात असलेल्या टर्किश स्पेशल क्रिम करीता प्रसिद्ध आहे. क्रिस्पीनेस साठी दोन्ही बाजूंनी त्या विशिष्ट क्रिम शेवयांनी लेयरिंग केली जाते. अधिक क्रिस्पी व्हावं म्हणून त्यावर विरघळलेल्या सॉल्टेड बटर लावला जातो.
advertisement
आता ठाण्यात खा चिकन कात्सू जापनीज पदार्थ; पाहा बनतो कसा Video
तयार कुनाफा टर्कीच्या त्या विशिष्ट क्रिमला बिस्कॉफ बिस्किट सोबत खवय्यांना गरमागरम सर्व्ह केला जातो. हा कुनाफा पदार्थ खाण्यास अत्यंत मऊ आणि क्रिस्पी असून स्वीट लवर्स खवय्यांना आवडणारा असा पदार्थ आहे. 200 ते 300 रुपयात खवय्ये या टर्किश डेजर्टचा आस्वाद घेऊ शकतात अशी माहिती कॅफेचे मालक संजय जैन यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
'या' टर्किश डेजर्टची चवच न्यारी; एकदा खाल तर म्हणालं लय भारी Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement