TRENDING:

बालपणीची मैत्री, लॉकडाऊनमध्ये घेतला निर्णय, रौनक आणि देविना कसे झाले युवा उद्योजक?

Last Updated:

Food Business: मुंबईतील मित्र-मित्रिणीने आपला स्वत: चा केक व पेस्ट्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे शिक्षण घेत क्लाउड किचनच्या माध्यमातून ते हा व्यवसाय करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निकिता तिवारी, प्रतिनिधी
advertisement

मुंबई: सध्याच्या काळात मराठी तरुण-तरुणी देखील आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीने यशस्वी उद्योजक होत आहेत. मुंबईची 21 वर्षीय देवीना ठाकूर आणि 23 वर्षीय रौनक फुटाणे हे दोघे शालेतील मित्र-मैत्रिण आहेत. शाळेपासूनच त्यांचा व्यवसाय करण्याचा मानस होत. पण नेमकी सुरुवात कुठून करायची याचा निर्णय होत नव्हता. कोरोना लॉकडाऊनच्या काळात देवीना आणि रौनक या दोघांनी मिळून केकचा बिझनेस करायचा ठरवला. सुरुवातीला त्यांनी कमी किमतीत छोट्या पेस्ट्री आणि केक विकायला सुरुवात केली. आता केक निर्मितीतून त्यांची चांगली कमाई होतेय.

advertisement

रौनक आणि देवीना यांनी लॉकडाऊनमध्ये मित्र परिवाराला केक आणि पेस्ट्री कमी किमतीत देण्याचे ठरवले. कमी किमतीत खूप उत्तम चव आणि गुणवत्ता मिळाल्यामुळे त्यांच्या पेस्ट्रीजना भरभरून प्रतिसाद मिळू लागला. मग त्यांनी केक आणि पेस्ट्रीची ऑर्डर घेण्याचे ठरवले. असं करत आज 5 वर्षांचा कालावधी उलटला आणि त्यांचा हा व्यवसाय चांगलाच स्थिरावला आहे. देवीना आणि रौनक यांनी आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या ऑर्डर्स स्वीकारल्या आहेत. तसेच दिवाळी आणि रक्षाबंधन यासारख्या सणानिमित्त गिफ्ट हॅम्पर देखील ते बनवत असतात.

advertisement

कोरोनात नोकरी गेली, YouTube वर पाहून बनवला मिल्क शेक, आता दादरमध्ये फेमस कॅफे

देवीना आणि रौनक स्वतःचे शिक्षण आणि नोकरी सांभाळून त्यांच्या बेकरी व्यवसायाला उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या ते दोघेही क्लाऊड किचनच्या माध्यमातून त्यांच्या केक आणि पेस्ट्रीची विक्री करत आहेत. हे युवा मराठी उद्योजक त्यांच्या उद्योगासाठी मेहनत घेत आहेत. तसेच भविष्यात स्वत:चा केकचा ब्रँड बनवून केक शॉप सुरू करण्याचा विचार असल्याचं ते सांगतात.

advertisement

कोणत्याही गोष्टीला कधीही उशीर नसतो

देवीना सांगते की, “इट्स नेव्हर टू लेट. कोणतीही गोष्ट करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. आम्ही दोघेही आमचे शिक्षण आणि नोकरी सांभाळून आमचा क्लाऊड किचनचा बिझनेस उत्तमरीत्या करत आहोत. जर तरुण उद्योजकांना खरंच व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी काही गोष्टींची तडजोड करुन  व्यवसायात उतरले पाहिजे.” तसेच रौनक फुटाणे सांगतो की, “इच्छा तिथे मार्ग हा मंत्र वापरून आम्ही आमचा व्यवसाय सुरू ठेवतो आहे, पण त्याच्यासाठी लागणारी मेहनत आम्ही दोघेही करत आहोत.”

advertisement

युवा उद्योजकांना आवाहन

दरम्यान, रौनक आणि देवीका या मराठी युवा उद्योजकांनी इतर तरुणांपुढे आपल्या व्यवसायातून एक आदर्श प्रस्थापित केला आहे. अगदी शिक्षण घेत असताना सुद्धा आपला व्यवसाय करता येऊ शकतो आणि त्यातून आपल्या आर्थिक गरजाही पूर्ण करता येतात, असे ते सांगतात. तसेच इतर तरुणांनी देखील आपला व्यवसाय सुरू करावा, असं आवाहन करतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
बालपणीची मैत्री, लॉकडाऊनमध्ये घेतला निर्णय, रौनक आणि देविना कसे झाले युवा उद्योजक?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल