देहरादून : काही फळं अशी असतात, ज्यांचं केवळ नाव आपल्याला माहित असतं मात्र त्यांचे फायदे माहित नसल्यामुळे आपण ते विकत घेत नाही. पीच फळही त्यापैकीच एक. जे दिसायला भारी आणि चवीला स्वादिष्ट असतं. शिवाय त्यात अनेक आरोग्यपयोगी गुणधर्म दडलेले असतात. विशेष म्हणजे हे फळ जेवढं पौष्टिक नसतं तेवढी त्याची बी आरोग्यासाठी गुणकारी असते.
advertisement
पीच फळाची बी वाटल्यावर तयार होणारी पावडर अंगदुखीवर रामबाण असते. कारण यात भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. देहरादूनचे आयुर्वेदिक डॉक्टर सिराज सिद्दीकी सांगतात की, पीच फळ हे व्हिटॅमिन सीचं उत्तम स्रोत आहे.
हेही वाचा : दादरमध्ये सर्वात भारी South Indian Food कुठं मिळतं? स्टेशनपासून फक्त 10 मिनिटांवर
पीच फळाची बी आयर्न, झिंक, पोटॅशियम आणि सोडियमने परिपूर्ण असते. तसंच यात फॅटी ऍसिडसुद्धा असतात. यात कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन बी 17चं प्रमाणही भरपूर असतं, ज्यामुळे शरीर ऊर्जावान राहण्यास मदत मिळते.
पीच फळाच्या बीमुळे रोगप्रतिकारक शक्ती उत्तम वाढते. तसंच या बीची पावडर थोड्या थोड्या प्रमाणात खाल्ल्यानं सर्दी, खोकला, ताप हे आजारही दूर राहतात. शिवाय स्मरणशक्ती तल्लख होण्यासाठीदेखील ही पावडर गुणकारी असते. त्वचेवर पिंपल, डाग असतील तर तेसुद्धा दूर होतात. महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी ही बी अत्यंत फायदेशीर असते. मासिकपाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखीवर तिचा वापर होऊ शकतो.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.