दादरमध्ये सर्वात भारी South Indian Food कुठं मिळतं? स्टेशनपासून फक्त 10 मिनिटांवर

Last Updated:

मिस्टर अय्यर यांनी कमी पैशात उत्तम साऊथ इंडियन फूड मिळावं या उद्देशानं हे दुकान सुरू केलं. इथला डोसा विशेष लोकप्रिय आहे. तो बनवण्याची पद्धतसुद्धा लोकांना आवडते.

+
इथले

इथले पदार्थ अगदी घरच्यासारखे वाटतात.

साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : अनेकजण हॉटेलमध्ये गेल्यावर सर्वात आधी ऑर्डर करतात मेदूवडा, इडली किंवा डोसा. म्हणजेच साऊथ इंडियन फूड बऱ्याचजणांना आवडतं. शिवाय ते चविष्ट आणि खिशाला परवडणारंही असतं. दादरमध्ये अनेक भागात साऊथ इंडियन फूड मिळतं. त्यातही कुठले पदार्थ लोकप्रिय आहेत पाहूया.
दादर स्टेशनपासून 10 मिनिटं अंतरावर असलेलं 'दादरची खाऊगिरी' हे दुकान साऊथ इंडियन फूडसाठी प्रचंड फेमस आहे. इथं दररोज सकाळी खास साऊथ इंडियन पदार्थांचा पोटभरून नाश्ता करण्यासाठी खवय्ये येतात. याठिकाणी इडली फक्त 35 रुपयांना मिळते, मेदूवडा 45 रुपयांना, डोसा 55 रुपयांना आणि पावभाजी केवळ 75 रुपयांना मिळते. सर्वच पदार्थ टेस्टी असल्यामुळे हे दुकान दादरकरांच्या आवडीचं आहे.
advertisement
मिस्टर अय्यर यांनी कमी पैशात उत्तम साऊथ इंडियन फूड मिळावं या उद्देशानं हे दुकान सुरू केलं. इथला डोसा विशेष लोकप्रिय आहे. तो बनवण्याची पद्धतसुद्धा लोकांना आवडते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दुकानात स्वच्छता व्यवस्थित पाळली जाते. त्यामुळे इथले पदार्थ अगदी घरच्यासारखे वाटतात.
advertisement
तसंच ऑर्डर मिळेल तशी गरमागरम घरगुती पावभाजी बनवली जाते. त्यासाठी चांगल्या दर्जाचं तेल आणि बटर वापरतात. 'आमच्याकडे मिळणारे पदार्थ कॉलेजच्या मुलांना खूप आवडतात. दुकानात खूप स्वच्छता ठेवली जाते. मी स्वतः शेफ असल्यामुळे या गोष्टींची आवर्जून काळजी घेतो', असं दादरची खाऊगिरी दुकानाचे शेफ जयेश सांगतात. त्यामुळे तुम्हालासुद्धा स्वादिष्ट साऊथ इंडियन फूड खायचं असेल तर दादर स्टेशनपासून 10 मिनिटांवर असलेल्या या दुकानात जाऊ शकता.
मराठी बातम्या/Food/
दादरमध्ये सर्वात भारी South Indian Food कुठं मिळतं? स्टेशनपासून फक्त 10 मिनिटांवर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement