पचनक्रिया चांगली राहावी आणि आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करणं आवश्यक आहे. काही फळं यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठीचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
B12 Deficiency : B12च्या कमतरतेची लक्षणं कशी ओळखायची ? जाणून घ्या सविस्तर माहिती
सफरचंद - सफरचंदांमधे पेक्टिन हे विरघळणारं फायबर असतं, यामुळे आतड्यांमधील घाण आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित होते आणि पचन सुधारतं.
advertisement
पपई - पपईतील पपेन नावाच्या एंजाइममुळे पचन सुधारतं. नियमितपणे खाल्ल्यानं बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट हलके वाटतं.
संत्री - संत्र्यांमधे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पाचक रस वाढतो आणि शरीरातील मुक्त रॅडिकल्स आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते.
डाळिंब - डाळिंबाच्या रसामुळे रक्त शुद्ध होतं, विषारी पदार्थ बाहेर काढले जातात आणि शरीराला ऊर्जा मिळते. यातले दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत.
पेरू - पेरूमधले फायबर आणि व्हिटॅमिन सी असतं, यामुळे पचनसंस्था मजबूत होते.
द्राक्षं - द्राक्षांमधे रेझवेराट्रोल आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे यकृत स्वच्छ करण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत होते. यामुळे पचनही चांगलं होतं.
Women Health : खास महिलांसाठी व्यायाम, स्नायू होतील बळकट, वेदना होतील कमी
किवी - किवीमधे फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. यामुळे पचनाला चालना मिळते आणि आतडी स्वच्छ ठेवण्यासाठी आणि पोट हलकं ठेवण्यास मदत होते.
नाशपती - नाशपतीमधे पाणी आणि फायबर दोन्ही असतं, यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढायला मदत होते. यामुळे पचन सुधारतं आणि पोटफुगी आणि जडपणा कमी होतो.
या फळांमुळे शरीरातील अस्वच्छता दूर होते तसंच पचन चांगलं होतं. ऊर्जा वाढवण्यास देखील मदत होते.
कोणताही आजार असेल तर आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
