TRENDING:

Menstruation : PMS साठी हे उपाय करुन पाहा, जाणून घ्या काय खावं, कशी काळजी घ्यावी ?

Last Updated:

पायात पेटके येणं, डोकं दुखण आणि चिडचीड ही बहुतेक महिलांसाठी प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम - पीएमएस म्हणजेच पाळी येण्याआधीची लक्षणं असू शकतात. यावर उपचार आयत्यावेळी करण्याऐवजी आधीपासूनच काळजी घेणं आवश्यक आहे. जेणेकरुन नंतर होणारा त्रास कमी होईल. जाणून घेऊया आहारातल्या कोणत्या घटकांनी यावर मात करता येईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मासिक पाळी म्हणजे बहुतांश महिलांसाठी वेदनेचा काळ. काही स्त्रियांना प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम अधिक जाणवतात. पण पीएमएसवर उपचार सुरू करायला उशीर करतात. लक्षणं किंवा वेदना आधीच सुरू होतात, त्यामुळे तेव्हा उपचार करणं फायदेशीर आहे. मासिक पाळीच्या दहा ते बारा दिवस आधी आराम मिळणं गरजेचं असतं.
News18
News18
advertisement

पायात पेटके येणं, डोकं दुखणं आणि चिडचीड ही बहुतेक महिलांसाठी प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम - पीएमएस म्हणजेच पाळी येण्याआधीची लक्षणं असू शकतात. यावर उपचार आयत्यावेळी करण्याऐवजी आधीपासूनच काळजी घेणं आवश्यक आहे. जेणेकरुन नंतर होणारा त्रास कमी होईल. जाणून घेऊया आहारातल्या कोणत्या घटकांनी यावर मात करता येईल.

याला 'ल्यूटियल फेज' म्हणतात, या काळात शरीराला काही पोषक तत्वांची आवश्यकता असते. हे पोषक घटक हार्मोन्स संतुलित करण्यासाठी, मूड चांगला ठेवण्यासाठी आणि स्नायूंना आराम देण्यासाठी मदत करतात.

advertisement

Metabolism: बैठ्या जीवनशैलीचे दुष्परिणाम ओळखा, ही योगासनं करायला सुरुवात करा

'ल्यूटियल फेज'मधे उपयुक्त ठरणारे पोषक घटक पाहूयात -

झिंकयुक्त अन्नपदार्थ - मासिक पाळीपूर्वीचे सिंड्रोम कमी करण्यासाठी झिंक हा सर्वात प्रभावी पोषक घटक आहे. मूड स्विंग्स, डोकेदुखी, स्तनांची कोमलता, पोटफुगी आणि पीएमएसची तीव्रता कमी करण्यासाठी याची मदत होते असं संशोधनातून दिसून आलं आहे. यासाठी दररोज फक्त एक चमचा भोपळ्याच्या बिया किंवा वाटीभर चणे खाल्ल्यानं खूप फरक पडू शकतो.

advertisement

व्हिटॅमिन बी6 असलेलं अन्न - व्हिटॅमिन बी6 मुळे शरीरात सेरोटोनिनचं प्रमाण वाढतं. सेरोटोनिन हा मूड आणि भूक नियंत्रित करणारा हार्मोन आहे. मासिक पाळीच्या आधीच्या दिवसांमधे खूप खावंसं वाटणं, चिडचीड होणं, थकवा येणं आणि भावूक वाटू शकतं या काळासाठी हे जीवनसत्त्व असलेले पदार्थ खाणं खूप उपयुक्त आहे.यासाठी एक केळं आणि मूठभर सूर्यफुलाच्या बिया खाणं फायदेशीर ठरेल असं आहारतज्ज्ञ लीमा महाजन यांनी म्हटलं आहे.

advertisement

Digestion: चुकीच्या सवयींमुळे पचनशक्ती होते कमकुवत, या डाएट टिप्स वाचा

कॅल्शियमयुक्त अन्नपदार्थ - मासिक पाळीआधीच्या सिंड्रोमवर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅल्शियम हा चांगला घटक आहे. पोटात पेटके येणं, सूज येणं, चिडचिड होणं आणि मूड ठिक नसणं असं होवू शकतं. हे टाळण्यासाठी, एक वाटी दही किंवा तीळ खाल्ल्यानं कॅल्शियमची पातळी सहज वाढू शकते.

advertisement

या तिन्ही पोषक घटकांमुळे काय फायदे होतात, थोडक्यात पाहूया. झिंकमुळे हार्मोन्स संतुलित करता येतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याची कमाल, 30 गुंठ्यात 90 टन घेतलं ऊस उत्पादन, अख्खं गाव पाहतच राहिलं!
सर्व पहा

व्हिटॅमिन बी6मुळे मूड स्थिर करणं शक्य होऊ शकतं आणि कॅल्शियममुळे स्नायूंना आराम मिळतो आणि पेटके येण्याचं प्रमाण कमी करता येतं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Menstruation : PMS साठी हे उपाय करुन पाहा, जाणून घ्या काय खावं, कशी काळजी घ्यावी ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल