Digestion : डॉक्टरांकडे जाण्याआधी बदला या सवयी, पचनशक्ती सुधारेल, तब्येत चांगली राहिल

Last Updated:

आयुर्वेदात, अन्न हे संस्कृती, आध्यात्मिक साधना आणि शक्तीशी जोडलेलं आहे. आरोग्य हे अन्नाच्या प्रमाणात नाही तर जेवणाच्या वेळेनुसार ठरवले जातं असं आयुर्वेद सांगितलं आहे. अन्नाचं योग्य पचन हे थेट आपल्या तब्येतीशी संबंधित आहे. जाणून घेऊया अन्नपचनाचं महत्त्व.

News18
News18
मुंबई : खाशील तर होशील ही म्हण आपण ऐकलेली असते. पण यासाठी खाण्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. आपल्या प्रकृतीनुसार अन्न खाणं हे चांगल्या तब्येतीसाठी आवश्यक आहे.
न्याहारी, जेवण म्हणजेच अन्न पोटात जाणं हे केवळ पोट भरण्याचं साधन नाही तर शरीराला ऊर्जा आणि शक्ती देण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे.
दिवसभरात थोडं थोडं सारखं खाण्यापेक्षा दिवसातून तीन वेळा खाणं हे शरीरासाठी अमृतासारखं आहे आणि यामुळे रोगांपासून शरीराचं संरक्षण होतं.
आयुर्वेदात, अन्न हे संस्कृती, आध्यात्मिक साधना आणि शक्तीशी जोडलेलं आहे. आरोग्य हे अन्नाच्या प्रमाणात नाही तर जेवणाच्या वेळेनुसार ठरवले जातं असं आयुर्वेद सांगितलं आहे. अन्नाचं योग्य पचन हे थेट आपल्या तब्येतीशी संबंधित आहे. जाणून घेऊया अन्नपचनाचं महत्त्व.
advertisement
शरीरात अन्न पचायला वेळ लागतो आणि त्या काळात दुसरं काही खाल्लं तर पोटातील पचनशक्ती कमकुवत होते. यासाठी पचनशक्ती मजबूत असणं सर्वात महत्वाचं आहे. पोटातील पचनशक्ती अन्नाचं योग्य पचन झाल्यानंतर ते पाचक रसात रूपांतरित होईल हे ठरवते.
पचनशक्ती मजबूत असेल तर अन्न पचवण्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि जर पचनशक्ती कमकुवत असेल तर अन्न पोटातच कुजण्यास सुरुवात होते, कारण पोटातील एंजाइम अन्नाचं योग्यरित्या विघटन करून त्याचं पाचक रसांमध्ये रूपांतर करू शकत नाहीत.
advertisement
कमी प्रमाणात अन्न वारंवार खाल्ल्यानं पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. शिवाय, भूक न लागता खाणं, रात्री उशिरा जेवणं आणि जास्त ताण यामुळे देखील पचनक्रिया कमकुवत होऊ शकते असं आयुर्वेदात म्हटलं आहे.
प्रत्येक जेवणानंतर पचनसंस्थेला शांत होण्यासाठी वेळ लागतो आणि नंतर पचन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी ऊर्जा आणि वेळ दोन्ही लागतात. अशा तुम्ही थोडं थोडं खाल्लं तर नवीन अन्न जुन्या अन्नात मिसळतं आणि रक्तात फक्त अर्धा पाचक रस मिसळतो, कारण आधीच्या अन्नाचं पचन पूर्ण झालेलं नसतं.
advertisement
यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात आणि हळूहळू शरीराचं वजन वाढायला सुरुवात होते. हार्मोन्स असंतुलित होतात आणि आम्लता, गॅस आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.
आयुर्वेदानुसार, दिवसातून केवळ दोन ते तीन वेळाच जेवावं. भूक लागल्यावरच जेवावं, अन्न पचण्यासाठी कमीत कमी तीन तास द्यावे आणि जेवणानंतर एक तासानं पाणी प्यावं. आयुर्वेदात सांगितलेल्या या आहाराच्या टिप्स वापरुन पाहा. आहारात कोणतेही मोठे बदल करण्याआधी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Digestion : डॉक्टरांकडे जाण्याआधी बदला या सवयी, पचनशक्ती सुधारेल, तब्येत चांगली राहिल
Next Article
advertisement
Prashant Bamb BJP :  ''...तर प्रशांत बंब यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही'', भाजप नेत्यानंच दिला इशारा
''...तर प्रशांत बंब यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही'', भाजप नेत्याचाच इशारा
  • ''...तर प्रशांत बंब यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही'', भाजप नेत्याचाच इशारा

  • ''...तर प्रशांत बंब यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही'', भाजप नेत्याचाच इशारा

  • ''...तर प्रशांत बंब यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही'', भाजप नेत्याचाच इशारा

View All
advertisement