दुधी भोपळ्यात सुमारे बारा टक्के पाणी असतं आणि उर्वरित फायबर असतं. दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. उन्हाळ्यात दुधीचा ज्यूस पिणं खूप फायदेशीर मानलं जातं. या ऋतूत भोपळा खाणं तब्येतीसाठी उपयुक्त आहे. दुधी भोपळा भारतीय पदार्थांमधे भरपूर वापरला जातो. दुधी भोपळा, सहज आणि कोणत्याही ऋतूत उपलब्ध होतो.
advertisement
Summer Care : थंड म्हणून दही खात असाल तर थांबा, उन्हाळ्यात या टिप्स लक्षात ठेवा
उन्हाळ्यात दुधी भोपळ्याचा रस पिण्यानं शरीराचं अनेक समस्यांपासून संरक्षण होऊ शकतं. कारण त्यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह आणि सोडियम असे अनेक गुणधर्म असतात.
दुधी भोपळ्याचा ज्यूस पिण्याचे फायदे -
1. उष्माघात टाळण्यासाठी -
उन्हाळ्यात भोपळ्याचा रस पिण्यानं उष्णतेच्या लाटेपासून शरीराचं संरक्षण होतं आणि शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
2. हृदय -
भोपळ्याचा रस नियमितपणे प्यायल्यानं रक्तदाब नियंत्रित होतो, ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.
Summer Facemask : उन्हाळ्यातही चेहरा दिसेल टवटवीत, घरी तयार करा फेस मास्क
3. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त -
लठ्ठपणाच्या समस्येनं त्रासला असाल आणि वजन कमी करायचं असेल तर दुधी भोपळ्याचा रस खूप फायदेशीर ठरू शकतो. हा रस प्यायल्यानं भूक नियंत्रित होण्यास मदत होते.
दुधी भोपळ्याचा रस बनवण्याची कृती -
दुधीचा रस बनवण्यासाठी, प्रथम दुधी भोपळा सोलून धुवा. लहान तुकडे करा. दुधीचे तुकडे मिक्सरमधे घाला, त्यात पुदिन्याची पानं घाला आणि मिक्सर सुरु करा. हा रस तयार झाल्यावर त्यात जिरे पावडर, मीठ आणि काळी मिरी पावडर घाला आणि चांगले मिसळा. आता त्यात बर्फ घाला आणि प्या.
या व्यतिरिक्त भारतीय स्वयंपाकघरात कायम बनवली जाणारी दुधी भोपळ्याची भाजी, कोफ्ता करी, दुधीची बर्फी, दुधी हलवा हे पर्याय विसरु नका.