Summer Care : थंड म्हणून दही खात असाल तर थांबा, उन्हाळ्यात या टिप्स लक्षात ठेवा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आयुर्वेदानुसार, दही हा एक जड आणि स्निग्ध पदार्थ मानला जातो, यामुळे शरीरात पित्त आणि कफ दोष दोन्ही वाढू शकतं. विशेषतः जर दही चुकीच्या वेळी, चुकीच्या प्रमाणात आणि चुकीच्या पद्धतीनं खाल्लं तर ते शरीरासाठी हानिकारक देखील ठरू शकतं.
मुंबई : उन्हाळ्यात थंड म्हणून दही खात असाल तर थांबा. थोडं दही खात असाल तर ठीक पण जास्त दही खाणं तब्येतीसाठी त्रासदायक ठरु शकतं. कारण, दही थंड वाटत असलं तरी आयुर्वेदानुसार, दह्यामुळे शरीरात पित्त आणि कफ दोष वाढू शकतो. आयुर्वेदात दही खूप फायदेशीर असल्याचं म्हटलं जात असलं तरी उन्हाळ्यात दही खाल्ल्यानं शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. कोणताही पदार्थ अति खाल्ल्यानं त्याचे परिणाम जाणवतात, त्यामुळे खाताना या बाबींकडे लक्ष द्या.
advertisement
आयुर्वेदानुसार, दही हा एक जड आणि स्निग्ध पदार्थ मानला जातो, यामुळे शरीरात पित्त आणि कफ दोष दोन्ही वाढू शकतं. विशेषतः जर दही चुकीच्या वेळी, चुकीच्या प्रमाणात आणि चुकीच्या पद्धतीनं खाल्लं तर ते शरीरासाठी हानिकारक देखील ठरू शकतं.
उन्हाळ्यात थोडं थंड बरं वाटावं म्हणून दही खाल्लं जातं पण दह्याचं स्वरूप गरम असतं. ज्यामुळे शरीरात अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
advertisement
दह्याचं स्वरूप उष्ण असल्यानं शरीरात कफ आणि पित्त दोष वाढू शकतो. पित्त दोषाच्या लक्षणांमध्ये छातीत जळजळ होणं, त्वचा लालसर होणं, डोळ्यांत जळजळ होणं, लवकर राग येणं किंवा चिडचिड होणं आणि झोप न येणं अशा समस्या जाणवू शकतात.
advertisement
दह्यानं पित्त दोष वाढू शकतो. तसंच, दह्यानं कफ दोष देखील वाढवू शकतो, ज्यामुळे रक्तसंचय होणं, जीभ पांढरी होणं, अन्न पचवण्यात समस्या, सकाळी उठण्यात समस्या जाणवू शकतात.
दह्यानं कफ दोष कसा वाढतो ?
दह्यानं शरीरात श्लेष्मा वाढतो, त्यामुळे सायनस किंवा रक्तसंचय सारख्या श्वसनाच्या समस्या वाढू शकतात. आयुर्वेदात दही खाणं, विशेषतः रात्री, दही खाणं निषिद्ध मानलं जातं कारण यामुळे पचनक्रिया मंदावते आणि कफदोष वाढू शकतो.
advertisement
दह्यानं पित्त दोष कसा वाढतो ?
आयुर्वेदात दह्याला गरम वीर्य मानलं जातं. याचा अर्थ दह्याचा मूळ गुणधर्म उष्ण आहे. यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते, ज्यामुळे पित्त दोष होऊ शकतो. दही आम्लयुक्त असतं, ज्यामुळे पित्त दोष होऊ शकतो. यामुळे अॅसिडिटी, त्वचेची जळजळ, मुरुमं आणि डोकेदुखी यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
advertisement
दही खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत -
- दही खायचं असेल तर ते सकाळी किंवा दुपारी खा.
- रात्री दही खाल्ल्यानं कफ आणि पित्त दोष वाढू शकतात.
- नेहमी फेटलेलं आणि पातळ दही खा. जाड दही पचायला जड असतं.
- दह्यात थोडी काळी मिरी पावडर किंवा हिंग मिसळून खा, यामुळे कफ कमी होतो.
advertisement
- दही कधीही गरम पदार्थांसोबत खाऊ नका, दही नेहमी थंड कोशिंबीर किंवा ताकाच्या स्वरूपात खा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 24, 2025 10:43 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care : थंड म्हणून दही खात असाल तर थांबा, उन्हाळ्यात या टिप्स लक्षात ठेवा