TRENDING:

Covishield: कोरोना लसीमुळे खरंच रक्ताच्या गुठळ्या होतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Last Updated:

ॲस्ट्राजेनिक कंपनीने दिलेल्या कबुलीमुळे लस घेतलेल्यांमध्ये घबराट पसरली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत मात्र याबाबत वेगळं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
एन शरथचंद्र, प्रतिनिधी
आता पुन्हा एकदा धाकधूक वाढलीये.
आता पुन्हा एकदा धाकधूक वाढलीये.
advertisement

हैदराबाद : आज आपण जेवढ्या सहजतेने वावरतोय, ही सगळी सहजता दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊनने बांधली होती. कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात हाहा:कार माजवला होता. या खतरनाक विषाणूमुळे अनेकजणांनी आपल्या प्रियजनांना गमावलं. यावर नेमका उपाय काय, कधीपर्यंत असं घाबरत घाबरत जगायचं, असा प्रश्न सर्वसामान्यांपासून मोठमोठ्या वैज्ञानिकांना पडला होता. अखेर कोरोनावर लस आली आणि कुठे सर्वांच्या जीवात जीव आला. नागरिकांनी एकामागून एक कोरोना लसीचे डोस घेतले. परंतु आता मात्र पुन्हा एकदा धाकधूक वाढलीये.

advertisement

कोरोना लसीचे आरोग्यावर गंभीर परिणाम होताहेत असे अनेक अहवाल यापूर्वी समोर आले जे फेटाळून लावण्यात आले. परंतु आता मात्र कोव्हिशिल्ड लस बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या AstraZeneca कंपनीने स्वत: यूकेच्या कोर्टात लसीकरणाचे गंभीर दुष्परिणाम होतात, अशी कबुली दिल्यानं संपूर्ण जग पुन्हा एकदा चिंतेत पडलंय.

हेही वाचा : Covishield vaccine : कोविशील्डमुळे वाढले हार्ट अटॅकचे प्रकरण? या गोष्टीत किती तथ्य?

advertisement

ज्यांनी लस घेतली त्यांच्यात TTS (थ्रोम्बोसिस विद थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम)ची लक्षणं दिसून येतात असा निष्कर्ष काढण्यात आलाय. शरिराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात असं म्हटलं जातंय, मात्र हे खूप दुर्मीळ आहे. परंतु एस्ट्राजेनेका कंपनीने दिलेल्या कबुलीमुळे लस घेतलेल्यांमध्ये घबराट पसरली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत मात्र याबाबत वेगळं आहे.

हेही वाचा : covishield मुळे लोकांनी लावला ह्रदयाला हात, covaxin बनवणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने केला खास खुलासा

advertisement

प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास यांनी लोकल18शी बोलताना सांगितलं, लस घेतल्यानंतर 45 दिवसांत तिचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. परंतु एवढ्या दीर्घ कालावधीनंतर दुष्परिणामांची शक्यता नसते. शिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब आणि तंबाखू खाणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सर्वाधिक असतो, त्यामुळे त्यांनी वेळोवेळी हृदयाची तपासणी करून घ्यावी. तसंच लस घेतलेल्या क्वचित व्यक्तींमध्येच तिचे दुष्परिणाम दिसून येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर डॉक्टरांनी हेही सांगितलं की, काही साइट इफेक्ट्स असले तरी लसीद्वारे होणारे फायदे जास्त असतात. त्यामुळे लोकांनी कोणताही गैरसमज बाळगू नये. घाबरून तर अजिबात जाऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Covishield: कोरोना लसीमुळे खरंच रक्ताच्या गुठळ्या होतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल