वर्धा: मोबाईल आणि लॅपटॉप हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सध्या जास्तीत जास्त वेळ हा मोबाईल आणि लॅपटॉपची स्क्रिन पाहण्यावर जातो. यामुळेच सध्याच्या काळात डोळ्यांच्या गंभीर समस्यांना अनेकांना सामोरे जावे लागत आहे. स्क्रिनमधून येणारा निळा प्रकाश हा डोळ्यांना अधिक नुकसानदायक ठरतो. ऑफिसचं काम करणाऱ्यांना याचा अधिक त्रास होताना दिसून येतोय. पण डोळ्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे आपण कोणते उपाय करू शकतो? यासंदर्भात वर्धा येथील नेत्ररोगतज्ञ डॉ प्रणय शिंदे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
नेहमी वापरा चष्मा
सध्या अनेकजण वर्क फ्रॉम होम किंवा ऑफिसमध्ये काम करताना लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईल वापरत असतात. त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. अशावेळी प्रत्येकाने आपल्या चष्म्याच्या नंबर प्रत्येक वर्षी चेक केला पाहिजे. चष्मा असो किंवा नसो दरवर्षी एकदा डॉक्टरांकडे जाऊन नंबर आहे की नाही तपासले पाहिजे. नंबर असेल तर चष्मा प्रॉपर वापरला पाहिजे. फक्त काम करताना चष्मा वापरणे चुकीचे आहे, असे डॉक्टर सांगतात.
उन्हाळ्यात डोळ्यांत आग आणि जळजळ होतेय? मग अशी घ्या काळजी
हा करा उपाय
जास्त वेळ जवळून स्क्रिन बघितली तर डोळ्यांचे मसल्स आकुंचित होतात. त्यामुळे डोळे दुखायला लागतात. असं जर होत असेल तर 20-25 मिनिटांनी एक ब्रेक घ्यायचा. 30-35 सेकंद डोळे बंद करायचे, असे केल्याने आकुंचित झालेले मसल्स थोडे रिलॅक्स होतील. नंतर परत काम करा. एकतर डोळे बंद करा अन्यथा थोडं बाहेर वावरा. जवळचं सोडून थोडं दूर बघण्याचा प्रयत्न करा. अशानेही थोडा आराम मिळू शकतो. कारण काम आपण थांबवू शकत नाही.
लाईट मॅच करायला हवा
काम करताना किंवा कोणतीही स्क्रिन बघताना रूमचा लाईट आणि स्क्रिनचा लाईट मॅच करायला हवा. कधीही अंधारात काम करू नये. अनेकांना झोपताना फोन बघण्याची सवय असते. मात्र स्क्रिनमधून निघणारे किरण डोळ्यांसाठी घातक असतात.
मृत्यूनंतरही 'त्या' जिवंत राहणार, 'ब्रेन डेड' झाल्यानंतर दिलं चौघांना जीवनदान, Video
योग्य तो चष्मा वापरा
डोळ्यांसाठी योग्य तो चष्मा वापरणे फार आवश्यक असतो. जेणेकरून स्क्रिन मधून निघणारे किरण डायरेक्ट डोळ्यांना लागणार नाही आणि डोळ्यांची हानी होण्यापासून वाचेल. अशाप्रकारे ज्यांचं भरपूर वेळ स्क्रिनवर काम असतं त्यांना आपल्या डोळ्यांची काळजी घेता येईल, असं डॉक्टर सांगतात.