डाळिंब फळबागेसाठी दरवर्षी 3 ते 4 लाख रुपयांपर्यंत खर्च जातो. मात्र वातावरणात होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांना तेल्या रोगाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मोठे आर्थिक संकट देखील शेतकऱ्यांवर आल्याने ते हतबल झाले आहेत. सरकारने कर्जमाफी करणार; पण कर्जमाफी कधी होणार, शेतकऱ्यांच्या मरणानंतर का? असा प्रश्न देखील फळबाग शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सर्वांना वाटते की फळबाग शेतकरी सुखी असेल, मात्र रोगामुळे कुणीही सुखी नाही. अक्षरशः तेल्या रोगाने थैमान घातलेले आहे.
advertisement
शेतीच्या मशागतीसाठी ना पैसे ना बैल, 65 वर्षांच्या शेतकरी आजी आजोबांनी स्वत:ला जुंपलं, VIDEO
डाळिंब शेतीला वातावरणाचा समतोल पाहिजे, तेव्हाच डाळिंब शेतीतून चांगले उत्पन्न मिळते. पाणी नसेल तर पीक वाळते. कधी पाऊस आला तर तेल्या रोग येतो. तसेच पारंपरिक शेती करायची म्हटलं तर कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. त्यामुळे फळबागायतदारांनी करायचे तरी काय, हे आम्हाला कळत नाही असे देखील उकर्डे यांनी म्हटले आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासनाचे पालन करून कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.