TRENDING:

Hair Care : केसांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला, या चुका करु नका, केसांचं आरोग्य जपा

Last Updated:

केसांना तेल लावणं चांगलं की वाईट यावर अनेक मतमतांतरं आहेत. तेल लावण्याची पद्धत चुकली किंवा केसांची, टाळूची स्वच्छता जपली नाही तर केसांत छोटे फोड यायला सुरुवात होते. केस निरोगी कसे ठेवावेत याबद्दल डॉ. रश्मी शेट्टी यांनी काही टिप्स दिल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : केसांचं आरोग्य चांगलं असेल तर केस वेगानं वाढतात, सुंदर दिसतात. निरोगी केसांचे हेअरकट आणि विविध केशरचनाही करता येतात. केसांची योग्य काळजी घेतली नाही तर त्याचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. केसांना तेल लावणं चांगलं की वाईट यावर अनेक मतमतांतरं आहेत. तेल लावण्याची पद्धत चुकली किंवा केसांची, टाळूची स्वच्छता जपली नाही तर केसांत छोटे फोड यायला सुरुवात होते.
News18
News18
advertisement

केस निरोगी कसे ठेवावेत याबद्दल डॉ. रश्मी शेट्टी यांनी काही टिप्स दिल्या आहेत. त्यांच्या मते, केसांच्या काळजीसाठी तेल बहुतेकदा वापरलं जातं. टाळूवर तेल लावलं जातं आणि मालिश केलं जातं आणि नंतर केस धुतले जातात. पण, केसांना तेल योग्यरित्या लावलं नाही तर त्याचा केसांच्या वाढीवर निश्चितच परिणाम होतो. यामुळे केसांचं आरोग्यही बिघडतं. डॉ. रश्मी शेट्टी यांनी, केसांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय देखील शेअर केले आहेत.

advertisement

Cloves : केसांच्या समस्या कमी करण्यासाठी सोपा उपाय, केसांची मुळं होतील मजबूत

केसांना तेल लावण्याची चुकीची पद्धत

केसांना तेल लावणं चांगलं आहे पण अनेकदा स्वच्छ टाळूऐवजी अस्वच्छ टाळूवर तेल लावणं केसांच्या आरोग्यासाठी घातक आहे. टाळू अस्वच्छ असेल किंवा डोक्यात कोंडा असेल, आणि त्यावर लावलेल्या तेलामुळे टाळू स्वच्छ राहत नाही आणि ही धूळ टाळूवरच राहते. त्यामुळे टाळूवर थर तयार होतो आणि तो भाग सुजतो.  काही काळानं यामुळे टाळूवर मुरुमं, फोड येतात. म्हणूनच तेल लावताना टाळू स्वच्छ असणं गरजेचं आहे असं डॉ. रश्मी यांनी सांगितलं.

advertisement

Pepper : काळ्या मिरीचे सात मोठे फायदे, मधासोबत खाल्ल्यानं आजार पळतील दूर 

केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स -

केस निरोगी ठेवण्यासाठी मेथीचे दाणे डोक्यावर लावता येतात.

आयुर्वेदिक भृंगराज तेल केसांसाठी फायदेशीर आहे.

मेथीचे दाणे, जास्वंदाची फुलं, कढीपत्ता आणि जिरं भृंगराज तेलात उकळा आणि केसांना लावा असा सल्ला डॉ. रश्मी यांनी दिला आहे.

advertisement

केसांना दहीही लावता येतं. यामुळे टाळू स्वच्छ राहतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care : केसांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला, या चुका करु नका, केसांचं आरोग्य जपा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल