TRENDING:

Walnut : आरोग्यासाठी फायदेशीर अक्रोड, मेंदू, हृदय, त्वचेसाठीही उपयुक्त

Last Updated:

अक्रोड हे सुकं फळ आरोग्यासाठी तर फायदेशीर आहेच आणि त्वचेसाठी देखील चांगला पोषक स्रोत आहे. अक्रोडामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि सुरकुत्या कमी करण्यासाठीही मदत होऊ शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्या आहारावर अवलंबून असतं आपलं स्वास्थ्य..आहाराव्यतिरिक्त सुका मेवा शरीरासाठी पोषक असतो. काजू आणि बदाम यासारखा सुका मेवा नेहमी खाल्ला जातो. अक्रोड हे सुकं फळ आरोग्यासाठी तर फायदेशीर आहेच आणि त्वचेसाठी देखील चांगला पोषक स्रोत आहे.
News18
News18
advertisement

Vitamins Deficiency : सतत झोप, आळस येत असेल तर सावध व्हा, जीवनसत्त्वांची कमतरता असू शकतं कारण

अक्रोडामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि सुरकुत्या कमी करण्यासाठीही मदत होऊ शकते. अक्रोडामध्ये  असलेलं ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड त्वचेला आतून मॉइश्चरायझ करण्यासाठी उपयुक्त आहे आणि त्वचेचा पोत चांगला ठेवण्यासाठीही याची मदत होऊ शकते. अक्रोडामध्ये झिंक देखील आढळतं, यामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात.

advertisement

अक्रोडामध्ये असलेल्या व्हिटॅमिन ईमुळे त्वचेवरचे डाग कमी होतात आणि त्वचा तजेलदार दिसते. अक्रोड हृदयासाठी फायदेशीर आहे. अक्रोडामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.

Sandalwood : शरीर, मानसिक शांतीसाठी करा चंदनाचा वापर, उन्हाळा होईल सुसह्य

अक्रोड खाणं मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अक्रोडामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे मेंदूचं कार्य आणि स्मरणशक्ती मजबूत करण्यात मदत होते.

advertisement

अक्रोडामुळे वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. अक्रोडामध्ये फायबर, प्रथिनं आणि हेल्दी फॅटसमुळे भूक नियंत्रित होते आणि त्यामुळे जास्त अन्न खाल्लं जात नाही. अक्रोडामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असतं, यामुळे हाडं मजबूत होतात. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, पचनसंस्थेला सुरळीतपणे काम करण्यासाठी फायबर फायदेशीर आहे.

काहींना सुका मेवा खाल्ल्यावर अंगावर एलर्जी येते, त्यामुळे सुका मेवा खाण्याआधी हा विचार नक्की करा.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Walnut : आरोग्यासाठी फायदेशीर अक्रोड, मेंदू, हृदय, त्वचेसाठीही उपयुक्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल