Sandalwood : शरीर, मानसिक शांतीसाठी करा चंदनाचा वापर, उन्हाळा होईल सुसह्य

Last Updated:

उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी चंदन हा एक प्रभावी आणि सुरक्षित उपाय आहे. त्वचा आणि शरीराला आराम देण्याबरोबरच चंदनामुळे मानसिक विश्रांतीही मिळते. योग्यरित्या आणि शुद्ध स्वरूपात चंदन वापरलं तर उष्णतेचे हानिकारक परिणाम बऱ्याच प्रमाणात टाळता येतात.

News18
News18
मुंबई : उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये तुम्हीही गारवा शोधत असाल तर चंदन हा पारंपरिक उपाय सर्वोत्तम आहे. शतकानुशतकं आयुर्वेद आणि पारंपरिक औषधांमध्ये चंदनाचा वापर केला जात आहे. उन्हाळ्यात चंदनाचा वापर कसा करावा याविषयी तज्ज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत.
उन्हाळ्यात चंदनाचा वापर केल्यामुळे त्वचेच्या टॅनिंगपासून आराम मिळेल, उष्णता कमी करण्यासाठीही चंदन उपयुक्त ठरेल. उन्हाळ्यात, कडक उन्हापासून, उष्णतेच्या लाटेपासून आणि घामापासून आराम मिळवण्यासाठी चंदनाचा वापर खूप फायदेशीर मानला जातो. आयुर्वेद आणि पारंपारिक औषधांमध्ये, चंदन हा थंडावा देणारा सर्वोत्तम नैसर्गिक घटक मानला जातो.
याशिवाय, चंदन त्वचेला थंड करण्याबरोबरच मानसिक ताण कमी करण्यासही उपयुक्त आहे. चंदन त्वचेच्या काळजीसाठी देखील एक उत्कृष्ट घटक आहे. डिसेंबर 2012 मध्ये रिसर्च गेटनं केलेल्या अभ्यासाच्या निकालांनुसार चंदनामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, यामुळे संसर्गापासून त्वचेचं रक्षण होतं. उन्हाळ्यात, चंदन पावडर गुलाब पाण्यात मिसळून फेस पॅक म्हणून वापरणंही खूप फायदेशीर आहे.
advertisement
यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि टॅनिंग, पुरळ आणि मुरुमांचं प्रमाण कमी होतं.
उष्माघात टाळण्यासाठी चंदनाचा वापर -
उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका जास्त असतो. शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी चंदनाची पेस्ट चांगला पर्याय आहे. पाठीवर, छातीवर, कपाळावर चंदनाची पेस्ट लावल्यानं शरीर थंड होतं आणि उष्माघाताचा धोका कमी होतो.तसंच, चंदनाच्या पाण्याचा वापर देखील खूप प्रभावी मानला जातो. पाण्यात चंदन पावडर मिसळून आंघोळ केल्यानं शरीर थंड होतं आणि उष्णतेमुळे येणाऱ्या पुरळांपासून आराम मिळतो.
advertisement
चंदनामुळे मानसिक ताण कमी होतो
बंगळुरूमधील एका आयुर्वेद संस्थेनं केलेल्या अभ्यासानुसार, चंदनाचा सुगंध मेंदूला शांत करतो आणि मानसिक ताण कमी करतो. उन्हाळ्यात मानसिक थकवा येतो, चिडचीड होते. अशावेळी, चंदनाचं तेल अरोमाथेरपी म्हणून वापरलं तर मन शांत करण्यासाठी याचा उपयोग होतो.
advertisement
या टिप्स लक्षात ठेवा -
चंदनाचा वापर नैसर्गिक स्वरूपातच करण्याची शिफारस तज्ज्ञ करतात. बाजारात उपलब्ध असलेल्या कृत्रिम चंदनाच्या उत्पादनांमध्ये रसायनं असू शकतात, यामुळे त्वचेला हानी पोहोचते. यामुळे फक्त शुद्ध चंदन पावडर किंवा तेल वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Sandalwood : शरीर, मानसिक शांतीसाठी करा चंदनाचा वापर, उन्हाळा होईल सुसह्य
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement