Sugar Control : रक्तातील साखर नियंत्रणासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या, साखरेची पातळी राहिल आटोक्यात
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
साखर न खाताही रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकणारे अनेक प्रमुख घटक आहेत. अपुरी झोप, ताणतणाव, अतिरिक्त कार्बोहायड्रेट्स आणि आतड्यांचं आरोग्य कसं आहे यावर रक्तातील साखरेची पातळी अवलंबून असते. यावर तज्ज्ञांनी जीवनशैलीतले काही बदल सुचवले आहेत.
मुंबई : मधुमेह किंवा रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची चिंता असेल, तर ते नियंत्रित करण्यासाठी पोषणतज्ज्ञांनी दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा. साखर न खाताही रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकणारे अनेक प्रमुख घटक आहेत. अपुरी झोप, ताणतणाव, अतिरिक्त कार्बोहायड्रेट्स आणि आतड्यांचं आरोग्य कसं आहे यावर रक्तातील साखरेची पातळी अवलंबून असते.
मधुमेह आणि त्याच्याशी संबंधित व्याधी हा एक प्रमुख चिंतेचा विषय बनला आहे. सर्व वयोगटातील नागरिकांना याचा फटका बसतो आहे. आहारातून प्रक्रिया केलेली साखर म्हणजेच प्रोसेस्ड शुगर काढून टाकण्याचा प्रयत्न करत असाल तरीही, जीवनशैलीतल्या घटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
रक्तातील साखरेची पातळी प्रभावीपणे कशी कमी करावी याबद्दल पोषणतज्ज्ञ पूजा मखीजा यांनी काही व्हिडिओ शेअर केले आहेत. प्रक्रिया केलेली साखर, अपुरी झोप, ताणतणाव, अतिरिक्त कार्बोहायड्रेट्स आणि आतड्यांचं आरोग्य यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
advertisement
1. अपुरी झोप
रात्रीची अपुरी झोप इन्सुलिन-प्रतिरोधक ठरु शकते, ज्यामुळे टाइप - 2 मधुमेह आणि इतर चयापचय संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. दिवसातून कमीत कमी आठ तास झोप घेतली पाहिजे, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास देखील मदत होईल.
2. दीर्घकालीन ताण
बराच काळ असलेल्या ताणामुळे आहारात साखर नसतानाही कॉर्टिसोलमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध आणि ग्लुकोज पातळी वाढू शकते. यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यान किंवा जेवणानंतर थोडं चालण्याचा सल्ला पूजा मखीजा यांनी दिला आहे.
advertisement
3. आतड्यांचं आरोग्य
आतड्यातील मायक्रोबायोम इन्सुलिन संवेदनशीलतेमध्ये मोठी भूमिका बजावते. योग्य आहार आणि चांगल्या फायबरमुळे आतड्यातील बॅक्टेरिया त्यातून ब्युटायरेट सारखे फॅटी अॅसिड तयार होतात. ब्युटायरेटमुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ रोखण्यास मदत होते, इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. निरोगी अन्न खाल्लं जात नाही, तेव्हा आतड्यातील सूक्ष्मजीव काम करत नाही, यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते. ग्लुकोज नियंत्रणासाठी आहारात प्रथिनं, तंतुमय पदार्थांना प्राधान्य देण्याची शिफारस आहार तज्ज्ञांनी केली आहे.
advertisement
4. कमी हालचाली
शरीराची पुरेशी हालचाल झाली नाही तर रक्तातील ग्लुकोज पातळी वाढलेली राहील, यामुळे साखरेची पातळी वाढेल, साखर खात नसाल तरीही साखरेची पातळी कमी करायची असेल तर पुरेशी हालचाल करावी लागेल. यासाठी, पोषणतज्ज्ञ स्ट्रेंथ ट्रेनिंगद्वारे स्नायू वाढवण्याची शिफारस करतात. यामुळे शरीर ग्लुकोज वापरण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करते, जेवणानंतर दहा मिनिटं चालल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते असाही सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
advertisement
५. जेवणांमध्ये खूप जास्त अंतर ठेवू नका
जास्त अन्न खाण्याचे परिणाम शरीरावर जाणवतात. खाण्यामध्ये जास्त अंतर असेल तर अधिक अन्न खाल्लं जाईल अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. जास्त अन्नामुळे साखरेची पातळी वाढते. साखर खात नसलात तरीही साखरेची पातळी वाढू शकते. म्हणून, जेवणांमध्ये थोडं अंतर असेल तर रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. आहारतज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीतील छोटे बदल रक्तातील साखरेची पातळी कमी आणि संतुलित करण्यासाठी उपयोगी आहेत. शरीर उर्जेचा वापर कशा पद्धतीनं करतं यावर या गोष्टी अवलंबून आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 10, 2025 5:38 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Sugar Control : रक्तातील साखर नियंत्रणासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या, साखरेची पातळी राहिल आटोक्यात