TRENDING:

घसा सतत खवखवतोय? किचनमध्येच आहे उपाय, काहीच दिवसात आवाज होईल खणखणीत!

Last Updated:

आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती आढळतात. अगदी आपल्या किचनमध्येही असे अनेक पदार्थ असतात जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ओम प्रकाश निरंजन, प्रतिनिधी
उपचार केले नाही तर सर्दी-खोकला असह्य होऊ शकतो.
उपचार केले नाही तर सर्दी-खोकला असह्य होऊ शकतो.
advertisement

कोडरमा : कडक उन्हातून घरात आल्यावर थंडगार पाणी प्यायलं की, जीवाला अगदी बरं वाटतं. त्यात जर घरात एसी सुरू असेल तर काही विचारायलाच नको, एवढा आनंद मिळतो. परंतु तुम्हाला माहितीये का, रखरखत्या उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी प्यायल्यास, एसीमध्ये बसल्यास अनेकजणांच्या घशाला त्रास होतो. जर त्यांनी त्यावर वेळीच उपचार केले नाही तर असह्य सर्दी-खोकला होऊ शकतो. आज आपण यावर साधा, सोपा आयुर्वेदिक उपचार पाहणार आहोत.

advertisement

आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती आढळतात. अगदी आपल्या किचनमध्येही असे अनेक पदार्थ असतात जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. परंतु आपल्याला केवळ त्यांबाबत पुरेशी माहिती नसते इतकंच.

हेही वाचा : गरोदरपणात करावी 'ही' योगासनं, नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता

डॉ. प्रभात कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरम पाण्यात मीठ घालून चूळ भरावी. असं दोन-तीन वेळा करावं, त्यामुळे घशाच्या खवखवीवर आराम मिळतो. शिवाय आपण दालचिनी, लहान वेलची, काळीमिरी, खडीसाखर, इत्यादींचं मिश्रण करून त्याची गोळी बनवून ती सकाळ-संध्याकाळी गरम पाण्यासोबत घेऊ शकता, त्यामुळेही घसादुखी बरी होते.

advertisement

सर्वात महत्त्वाचं म्हणजे कडाक्याच्या उन्हातून थेट कमी तापमानात जाणं टाळावं. त्याआधी शरिराचं तापमान सामान्य होऊ द्यावं. शिवाय अति थंड पेय घेऊ नये. रात्रीच्या वेळी दही किंवा मिठाई खाऊन लगेच पाणी प्यायल्यानेही घशाला त्रास होऊन शकतो. घशाची खवखव कमी करण्यासाठी मधदेखील फायदेशीर असतं. मध गरम पाण्यात मिसळून घेतल्यास आराम मिळू शकतो.

advertisement

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
घसा सतत खवखवतोय? किचनमध्येच आहे उपाय, काहीच दिवसात आवाज होईल खणखणीत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल