डोकं नीट स्वच्छ न करणं, रासायनिक गोष्टींचा अतिवापर आणि अयोग्य आहार यामुळेही कोंड्याची समस्या उद्भवते. डोक्यात कोंडा जमा होऊ लागला की केसांपेक्षा टाळूवर जास्त कोंडा दिसू लागतो.
कोंड्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय वापरुन पाहता येतील. दही, कोरफड, कडुनिंबाची पानं, मेथी दाणे या नैसर्गिक उपायांनी केसांवरच्या कोंड्याचं प्रमाण कमी होतं.
Headache : डोकेदुखीकडे दुर्लक्ष करु नका, योग्य उपचार करा, दुखणं टाळा
advertisement
कडुनिंबाची पानं
कडुनिंबाची पानं कोंडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. या पानांमध्ये अँटी-फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. या गुणधर्मांमुळे टाळूची जळजळ दूर होते आणि कोंडा कमी करण्यासाठी म्हणूनच ही पानं प्रभावी ठरतात. कडुनिंबाची पानं पाण्यात उकळून या पाण्यानं डोकं धुता येतं किंवा कडुनिंबाच्या पानांची पेस्ट केसांना लावल्यानं त्याचा परिणाम दिसून येतो.
मेथी दाणे
मेथीचे दाणे डोक्यावर लावल्यानंही खूप फायदा होतो. मेथी दाण्यांत अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडंट्स असल्यानं केसांसाठी हे दाणे उपयुक्त आहेत. मेथी दाणे भिजवून ठेवा आणि मग बारीक करुन केसांना लावल्यानं केसांची वाढ होण्यास मदत होते. यामुळे टाळू स्वच्छ राहतो आणि कोंडा दूर होतो. मेथीचे दाणे आठवड्यातून एक किंवा दोनदा डोक्यावर लावता येतात.
Laughter : हसताय ना ? हसायलाच पाहिजे, शारीरिक - मानसिक आरोग्यासाठीचं औषध
दही
दही हा कोंड्यावर रामबाण उपाय आहे. दह्यानं डोकं धुतल्यानं डोक्यातील कोंडाही दूर होतो. केसांना हेअर मास्कप्रमाणे अर्धा तास दही लावता येईल. याशिवाय दह्यात लिंबू मिसळून केसांना लावल्यानं कोंडा कमी होण्यास मदत होते.
कोरफड
कोरफडीत असलेल्या दाहक-विरोधी गुणधर्मांचा कोंडा दूर करण्यासाठी फायदा होतो. कोरफडीचा गर डोक्यावर लावल्यानं टाळूची जळजळ दूर होते, कोंडा दूर होतो आणि केस मऊ होण्यास मदत होते. कोरफडीचा गर कोरफडीच्या जेलपेक्षा जास्त फायदेशीर ठरतो. डोक्यावर लावल्यानं बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाचं संक्रमणही कमी होतं. कोरफडीचा गर अर्धा तास टाळूवर आणि केसांवर ठेवल्यानंतर धुऊन काढता येतो.