आयुर्वेदानुसार, दही हा एक जड आणि स्निग्ध पदार्थ मानला जातो, यामुळे शरीरात पित्त आणि कफ दोष दोन्ही वाढू शकतं. विशेषतः जर दही चुकीच्या वेळी, चुकीच्या प्रमाणात आणि चुकीच्या पद्धतीनं खाल्लं तर ते शरीरासाठी हानिकारक देखील ठरू शकतं.
उन्हाळ्यात थोडं थंड बरं वाटावं म्हणून दही खाल्लं जातं पण दह्याचं स्वरूप गरम असतं. ज्यामुळे शरीरात अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
advertisement
Summer Facemask : उन्हाळ्यातही चेहरा दिसेल टवटवीत, घरी तयार करा फेस मास्क
दह्याचं स्वरूप उष्ण असल्यानं शरीरात कफ आणि पित्त दोष वाढू शकतो. पित्त दोषाच्या लक्षणांमध्ये छातीत जळजळ होणं, त्वचा लालसर होणं, डोळ्यांत जळजळ होणं, लवकर राग येणं किंवा चिडचिड होणं आणि झोप न येणं अशा समस्या जाणवू शकतात.
दह्यानं पित्त दोष वाढू शकतो. तसंच, दह्यानं कफ दोष देखील वाढवू शकतो, ज्यामुळे रक्तसंचय होणं, जीभ पांढरी होणं, अन्न पचवण्यात समस्या, सकाळी उठण्यात समस्या जाणवू शकतात.
दह्यानं कफ दोष कसा वाढतो ?
दह्यानं शरीरात श्लेष्मा वाढतो, त्यामुळे सायनस किंवा रक्तसंचय सारख्या श्वसनाच्या समस्या वाढू शकतात. आयुर्वेदात दही खाणं, विशेषतः रात्री, दही खाणं निषिद्ध मानलं जातं कारण यामुळे पचनक्रिया मंदावते आणि कफदोष वाढू शकतो.
Summer Care : उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी हा उपाय नक्की करा, बडीशेप - खडी साखरेचा होईल उपयोग
दह्यानं पित्त दोष कसा वाढतो ?
आयुर्वेदात दह्याला गरम वीर्य मानलं जातं. याचा अर्थ दह्याचा मूळ गुणधर्म उष्ण आहे. यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते, ज्यामुळे पित्त दोष होऊ शकतो. दही आम्लयुक्त असतं, ज्यामुळे पित्त दोष होऊ शकतो. यामुळे अॅसिडिटी, त्वचेची जळजळ, मुरुमं आणि डोकेदुखी यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
दही खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत -
- दही खायचं असेल तर ते सकाळी किंवा दुपारी खा.
- रात्री दही खाल्ल्यानं कफ आणि पित्त दोष वाढू शकतात.
- नेहमी फेटलेलं आणि पातळ दही खा. जाड दही पचायला जड असतं.
- दह्यात थोडी काळी मिरी पावडर किंवा हिंग मिसळून खा, यामुळे कफ कमी होतो.
- दही कधीही गरम पदार्थांसोबत खाऊ नका, दही नेहमी थंड कोशिंबीर किंवा ताकाच्या स्वरूपात खा.