डास नियंत्रणासाठी तुळस आणि लेमन ग्राससारखी औषधी वनस्पती घरात ठेवावीत. ही रोपे डासांना दूर ठेवतात. याशिवाय अर्ध्या लिंबात काही लवंगा टोचून खिडकीजवळ ठेवल्यास डास घरात येत नाहीत. संध्याकाळी नारळाच्या सालीचा धूर केल्यास परिसरातील डास पसार होतात. लसूण उकळून त्याच्या पाण्याचा स्प्रे केल्यास डासांपासून नैसर्गिकरित्या संरक्षण मिळते.
advertisement
सावधान, पावसात वाढतोय डेंग्यूचा धोका! डेंग्यूपासून स्वतःचं संरक्षण कसं कराल? वाचा लक्षणे आणि उपाय...
झुरळे आणि मुंग्या टाळण्यासाठी बेकिंग सोडा आणि साखर समान प्रमाणात मिसळून झुरळे दिसणाऱ्या जागी ठेवावे. लिंबाचा रस आणि मीठ पाण्यात मिसळून स्वयंपाकघरात पुसल्यास मुंग्या घरातून निघून जातात. झुरळांना पायमोड करण्यासाठी बोरिक पावडरचा वापर प्रभावी ठरतो. हे उपाय नियमितपणे केल्यास घरात किड्यांचा वावर कमी होतो.
पावसाळ्यात पाणी साचू न देणे हा डासांपासून वाचण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. पाण्याच्या टाक्या, कूलर, कुंड्या यामध्ये पाणी साचल्यास लगेच साफ करावे. प्लॅस्टिकचे डबे, बाटल्या, झारे या गोष्टी खुल्या ठेवू नयेत. घर रोज झाडून आणि पुसून स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. स्वच्छतेच्या सवयींमुळे घर निरोगी राहते आणि आजारांपासून संरक्षण मिळते.
अशा प्रकारचे घरगुती उपाय नैसर्गिक, स्वस्त आणि आरोग्यास सुरक्षित असतात. कीटक नष्ट करणाऱ्या केमिकल्सपेक्षा हे पर्याय अधिक परिणामकारक आहेत. त्यामुळे यंदाचा पावसाळा करा कीटकमुक्त, आणि तुमचे घर ठेवा निरोगी, स्वच्छ आणि सुरक्षित, असं डॉ. विलास राठोड सांगतात.