गोपालगंज : पावसाळा कितीही गारवा घेऊन येत असला, सर्वत्र हिरवळ आणि प्रसन्न वातावरण असलं तरी याच काळात साथीचे आजार झपाट्यानं पसरतात. विशेषतः मलेरिया, डेंग्यूची रुग्णसंख्या वाढते. मात्र घरच्या घरीच आपण या आजारांपासून आपलं रक्षण करू शकतो.
डेंग्यू झाला आणि त्यावर वेळीच उपचार मिळाले नाही, तर हा आजार जीवावरही बेतू शकतो. डासांमुळे हा भयंकर ताप येण्याची शक्यता असते. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून मोठ्या प्रमाणात डास उत्पत्ती होते. त्यामुळे आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं. यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी, जाणून घेऊया.
advertisement
हेही वाचा : नव्या केसांचं माहित नाही, पण आहेत ते केस वाचू शकतात! खोबरेल तेलात मिसळा 5 गोष्टी
आयुर्वेदिक डॉ. महंत शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताप, डोकेदुखी, पाठदुखी ही डेंग्यूची लक्षणं आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ताबडतोब डॉक्टरांकडे जा. पावसाळ्यात आपण हे सर्वसामान्य आजार समजून घरच्या घरी बरं होण्याची वाट पाहतो. मात्र साध्या वाटणाऱ्या या आजारांचं स्वरूप कधी गंभीर होतं हे आपल्यालाही कळत नाही. त्यामुळे काळजी घ्यावी.
सर्वात महत्त्वाचं आहे ते घर स्वच्छ ठेवणं. घरात डास येता कामा नये. शिवाय पाण्याची भांडीही वेळच्या वेळी स्वच्छ धुवून त्यात नवं, उकळलेलं पाणी भरावं. तसंच साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी संतुलित आहारावर भर द्यावा. तुळशीची पानं खाल्ल्यानं निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. शिवाय पपईचा रसही फायदेशीर ठरतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंगात साधी कणकण जरी जाणवली, तरी ती हलक्यात घेऊ नका. ताप चढण्याआधीच त्यावर उपाय करा.