अहमदाबादचे मानसोपचार तज्ज्ञ निलय पटेल यांनी नैराश्य आणि चिंता याविषयी सविस्तर माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, चिंता आणि नैराश्य हे आजार आता सामान्य झाले आहेत. हे दोन्ही आजार वेगवेगळे आहेत. यांची मुख्य कारणे आहेत की, लोक अभ्यासासाठी स्वत:ला वेळ देऊ शकत नाही आहेत आणि कॉलेज जीवनात मोबाईलचा अधिक वापर केला जात आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होत आहेत. जेव्हा असे होते, तेव्हा व्यक्ती चिंता आणि नैराश्याला बळी पडते.
advertisement
ऑनलाइन गेमिंगचा नाद, अल्पवयीन मुलानं आपल्याच घरात केली 40 लाखांची चोरी, धक्कादायक घटना
काय आहे उपाय -
निलय पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या कुटुंबातील सदस्यामध्ये असे लक्षण दिसले तर त्यांनी त्या सदस्यासोबत त्याला आवडणाऱ्या गोष्टी कराव्या. तसेच त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा. यामुळे कुटुंबात त्याला एक सुखद अनुभव येईल. यामुळे त्याला चांगला वाटेल आणि तो व्यक्ती लवकरच बरा होईल. तसेच जर एखादी व्यक्ती 15 दिवसांपेक्षा जास्त काळ नैराश्यात असेल तर त्याने त्वरित मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे. तसेच रुग्णाने मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळेवर औषध घ्यावे, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला.
सूचना - या बातमीत दिलेल्या माहिती ही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या चर्चेच्या आधारावर आहे. ही सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तिगत सल्ला नाही. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही औषधी घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या बातमीतील मतांशी लोकल18 मराठी कोणताही दावा करत नाही.