एखाद्या विशिष्ट जीवनसत्त्वाची कमतरतेमुळे शरीर निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात जीवनसत्त्व घेणं खूप महत्वाचं आहे. आपल्या शरीरात काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे देखील जास्त झोप येऊ शकते. पाहूयात यामुळे शरीरावर होणारे परिणाम आणि उपाय
ड जीवनसत्वाची कमतरता
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता हे थकवा आणि आळस येण्याचं मुख्य कारण असू शकतं. हाडांची ताकद, स्नायूंची ताकद आणि उर्जेची पातळी राखण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचं संतुलन बिघडतं, ज्यामुळे अशक्तपणा जाणवतो.
advertisement
Sandalwood : शरीर, मानसिक शांतीसाठी करा चंदनाचा वापर, उन्हाळा होईल सुसह्य
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणं
सकाळी उठल्यानंतरही थकवा जाणवणं.
सतत झोप येणं.
सांधे आणि स्नायू दुखणं.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे मज्जासंस्थेवर होणारे परिणाम
शरीरात व्हिटॅमिन बी 12ची कमतरता असेल तर मज्जासंस्था आणि उर्जेच्या पातळीवर नकारात्मक परिणाम होतो. व्हिटॅमिन बी 12 हे जीवनसत्व लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये आणि मज्जासंस्थेचं कार्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.
लक्षणं:
अशक्त वाटणं आणि सुस्ती येणं.
लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येणं
सतत आळस जाणवणं.
कमतरतेवर मात करण्यासाठी उपाय -
1. सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळवा - जीवनसत्तव ड साठी मुख्य स्रोत नैसर्गिक सूर्यप्रकाश आहे. दररोज सकाळी 15-20 मिनिटं सूर्यप्रकाशात घालवा. यासोबतच तुम्ही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंड्यातील पिवळ बलक, तृणधान्यं देखील खाऊ शकता.
2. व्हिटॅमिन बी 12 समृद्ध असलेले पदार्थ खाण्यानं जीवनसत्वांची कमतरता भरुन येऊ शकते. त्यासाठी आहारात मासे, चिकन आणि अंडी, दूध आणि चीज यांचा समावेश करु शकता.
3. पूरक आहार घेणं - आहारातून आवश्यक प्रमाणात जीवनसत्त्वं मिळत नसतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूरक आहार घ्या. सप्लिमेंटसद्वारे जीवनसत्वांची कमतरता भरुन काढण्यात मदत होते.
Sugar Control : रक्तातील साखर नियंत्रणासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या, साखरेची पातळी राहिल आटोक्यात
महत्त्वाच्या टिप्स -
हायड्रेटेड रहा: पुरेसं पाणी प्यायल्यानं शरीर ताजंतवानं राहतं.
शारीरिक हालचाल करा: नियमित व्यायाम आणि योगासनं आळस दूर करण्यास मदत करतात.
संतुलित आहार घ्या: जीवनसत्त्वं आणि खनिजं असलेला समृद्ध आहार घ्या.
शरीरात व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे उर्जेच्या पातळीवर परिणाम होतो आणि तुम्हाला नेहमीच आळशी वाटतं. यावर मात करण्यासाठी, योग्य आहार, सूर्यप्रकाश आणि नियमित व्यायाम तुमच्या दिनचर्येचा भाग असणं गरजेचं आहे.