TRENDING:

Summer Care :  उन्हाळ्यात यकृताचं आरोग्य जपा, थंड पेयांचं अतिसेवन ठरु शकतं धोक्याची घंटा 

Last Updated:

यकृत निरोगी ठेवण्यासाठी, योग्य आहार आणि हायड्रेशन आवश्यक आहे आणि त्यातून उन्हाळ्यात आणखी लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही ही पेयं जास्त प्रमाणात घेत असाल तर यकृत निरोगी राहण्यासाठी सवयी ताबडतोब बदलण्याची गरज आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्यामधे प्रचंड ऊन, तीव्र सूर्यप्रकाशामुळे डिहायड्रेशन होतं आणि पटकन उपलब्ध होणारा पर्याय म्हणून थंड पेय, ज्यूस पिण्याकडे कल वाढतो. पण हा पर्याय यकृतासाठी धोकादायक ठरु शकतं. गळ्याला  थंडावा देणारा पर्याय असला तरी या थंड पेयांचं अतिसेवन प्रकृतीसाठी गंभीर आहे.
News18
News18
advertisement

यकृत निरोगी ठेवण्यासाठी, योग्य आहार आणि हायड्रेशन आवश्यक आहे आणि त्यातून उन्हाळ्यात आणखी लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही ही पेयं जास्त प्रमाणात घेत असाल तर यकृत निरोगी राहण्यासाठी सवयी ताबडतोब बदलण्याची गरज आहे.

यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, यामुळे विषारी पदार्थ काढून टाकणं आणि पोषक तत्वांचं पचन करण्यासाठी मदत होते. पण, खाण्याच्या वाईट सवयी आणि प्रकृतीसाठी धोकादायक पेयांचं सेवन  यामुळे यकृतामत चरबी जमा होऊ शकते, ज्याला फॅटी लिव्हर म्हणतात. ही समस्या हळूहळू गंभीर होऊ शकते. वेळेअभावी आणि अनेकदा आळसामुळे आपण आपल्या शरीराला काहीही खायला देतो.

advertisement

Summer Care : उन्हाळ्यात जपा त्वचेचं सौंदर्य, या टिप्सचा होईल उपयोग

यकृताच्या तब्येतीसाठी वाईट पेयं -

1. जास्त साखरेचं प्रमाण असलेली शीतपेयं

सॉफ्ट ड्रिंक्समध्ये साखर आणि फ्रुक्टोजचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे यकृत अतिरिक्त चरबी साठवण्यास प्रवृत्त होतं. सतत आणि अति सेवनानं नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) होण्याचा धोका वाढतो.

advertisement

2. दारू

जास्त प्रमाणात मद्यपान करणं यकृतासाठी सर्वात हानिकारक आहे. यामुळे यकृताच्या पेशींना नुकसान पोहोचून अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होऊ शकते. हळूहळू लिव्हर सिरोसिस आणि इतर गंभीर समस्यांचा धोका वाढतो.

3. जास्त कॅफिन असलेले एनर्जी ड्रिंक्स

काही एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे यकृतावर अतिरिक्त दबाव येतो. जास्त कॅफिन असलेले एनर्जी ड्रिंक्स प्यायल्यानं यकृताची डिटॉक्सिफिकेशन क्षमता कमकुवत होऊ शकते.

advertisement

Summer Care : टॅनिंग कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय, त्वचा पुन्हा दिसेल तजेलदार

4. प्रक्रिया केलेले फळांचे रस

बाजारात उपलब्ध असलेल्या पॅक केलेल्या फळांच्या रसांमध्ये जास्त साखर आणि संरक्षक घटक म्हणजेच preservatives असतात. यामध्ये नैसर्गिक फायबरचा अभाव असतो, ज्यामुळे यकृत चरबीवर योग्यरित्या प्रक्रिया करू शकत नाही आणि हळूहळू फॅटी लिव्हरची समस्या वाढू शकते.

advertisement

प्रकृतीसाठी चांगली पेयं -

ताज्या फळांचा रस किंवा लिंबूपाणी प्या.

ग्रीन टी आणि हर्बल ड्रिंक्स प्या .

दररोज पुरेसं पाणी प्या.

अल्कोहोल आणि प्रक्रिया केलेलं पेयं टाळा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care :  उन्हाळ्यात यकृताचं आरोग्य जपा, थंड पेयांचं अतिसेवन ठरु शकतं धोक्याची घंटा 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल