डॉक्टरांचा सल्ला गरजेचा
मागील काही वर्षात आपण असं पाहिलंय की, गरबा दांडिया खेळताना बऱ्याच लोकांना हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. जे लोक तासनतास गरबा खेळतात आणि त्याची त्यांच्या शरीराला सवय नसते. आपण जिम जॉईन करतो तेव्हा आधी आपण वोर्मअप करतो. आपला व्यायाम वाढवतो. त्याच प्रकारे आपल्याला गरबा खेळताना सुरुवातीला काही त्रास होत नाही ना हे जाणून घेणं महत्वाचं आहे. पण काही झाल्यास तिथेच थांबून डॉक्टराचा सल्ला घेणंही गरजेचं आहे, असं डॉ. राऊत सांगतात.
advertisement
नवरात्रीत घटाला फुलांची माळ का वाहतात? कशी सुरू झाली परंपरा?
गरबा खेळताना ही घ्या काळजी
गरबा खेळताना आपल्या शरीरातून घामावाटे भरपूर प्रमाणात पाणी निघून जाते. त्यामुळे डीहायड्रेशन होते. खूप जेवण करून देखील गरबा खेळण टाळलं पाहिजे. हलक अन्न घेऊन आपण गरबा नक्कीच खेळू शकतो. शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, हृदय विकार असलेल्या लोकांनी डॉक्टराच्या सल्ल्यानेच गरबा खेळायला हवा. त्यातून काही त्रास झाल्यास छातीत दुखणं, दम लागण, घाम येणं, चक्कर येत असेल तर तिथेच थांबून डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. अशा प्रकारे काळजी घेऊन गरबा खेळू शकता, असं डॉ. निखिल सांगतात.
दरम्यान, सणासुदीच्या काळामध्ये प्रत्येक माणूस हा उत्साहात आणि जोशात जल्लोषात सण साजरे करत असतो. परंतु हे करत असताना आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. आपल्याला कुठल्यालाही गंभीर गोष्टींचा सामना करावा लागणार नाही. यासाठी हृदय सांभाळणं अत्यंत आवश्यतक असतं.