डॉक्टर रोहित बोरकर मुळचे हिंगोलीचे असून पुण्यात स्थायिक आहेत. यांनी आपल्या सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन यांच्या माध्यमातून पुण्यातील धानोरी परिसरात 1 रुपयामध्ये दवाखाना सुरू केला आहे. भारतीय विद्यापीठमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना ही कल्पना सुचली. त्यांच्या वडिलांना बिकट आर्थिक परिस्थितीमुळे वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि याच कारणाने बालपणी-वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे ही वेळ कोणावरही येऊ नये यासाठी डॉक्टर रोहित बोरकर यांनी ही आरोग्यसेवा गरीब गरजू नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली असल्याचं त्यांनी म्हटलंय.
advertisement
आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालकापासून घरीच बनवा चकली; सोप्या रेसिपीचा पाहा Video
1 रुपयांत दवाखाना या आरोग्य सेवेत नागरिकांना OPD, ECG, Sugar, IV saline, Nebulization, General medicine अशा सुविधा मिळतील. त्याचबरोबर यासाठी तज्ञ डॉक्टरांची नेमणूक देखील करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया मार्गदर्शन, शासकीय आरोग्य योजना माहिती, वैद्यकीय आर्थिक मोफत मार्गदर्शक, मोफत आरोग्य शिबिर , शस्त्रक्रियेला आर्थिक मदत मार्गदर्शन, अशा सुविधा पुरवल्या जातात या कामासाठी त्यांना समाजातील विविध संस्था देखील मदत करतात,अशी माहिती डॉ. बोरकर यांनी दिली आहे.