रायपूर : मूतखड्याचा त्रास सध्या सामान्य झालाय. आपल्या खाण्यात अनेक दाणेदार पदार्थ येतात, ज्यामुळे मूतखडे होऊ शकतात. मूतखड्यांमुळे असह्य पोटदुखीचा सामना करावा लागतो. लघवीला त्रास होतो, लघवीच्या जागी जळजळ होते. त्यामुळे या त्रासावर शक्य तितक्या लवकर उपचार केलेले बरे.
खरंतर आपल्या आजूबाजूला अशा अनेक औषधी वनस्पती असतात ज्यांच्या वापराने आपलं संपूर्ण आरोग्य सुदृढ राहू शकतं. परंतु आपल्याला केवळ त्यांबाबत पुरेशी माहिती नसते, इतकंच. पानफुटीही त्यापैकीच एक. या वनस्पतीमुळे शरिरावर झालेला कोणताही घाव, जखम भरून निघते, असं डॉक्टर सांगतात. आयुर्वेदात या वनस्पतीचे अनेक फायदे दिलेले आहेत. डॉ. राजेश सिंह यांनी याबाबत माहिती सांगितली आहे.
advertisement
हेही वाचा : चहा, कॉफी सोडा; स्पेशल Tea घ्या, वजन झटक्यात होईल कमी! रेसिपी सोपी
प्राचीन काळापासून उपचारांसाठी आयुर्वेदात पानफुटीचा वापर केला जातो. नियमितपणे पानफुटीचं सेवन केल्यास अनेक आजारांवर आराम मिळतो. तसंच पानफुटीपासून विविध औषधंदेखील बनवली जातात. एअर प्लांट, कॅथेड्रल बेल्स, लाइफ प्लांट आणि मॅजिक लीफ पानफुटीला इंग्रजीत अशा विविध नावांनी ओळखलं जातं. तर, हिंदीत म्हणतात पत्थरचट्टा. कारण ती दगडांमध्ये उगवते. शिवाय या वनस्पतीमुळे मूतखडे अगदी बारीक बारीक होऊन लघवीवाटे शरिराबाहेर पडतात. म्हणूनच पानफुटी मूतखड्यावर रामबाण मानली जाते.
पानफुटीची पानं जाड असतात, जी चवीला अत्यंत कडू लागतात. मात्र विविध आजारांवर गुणकारी असतात. शिवाय या वनस्पतीवर गुलाबी, हिरवी फुलंसुद्धा येतात, ज्यांमुळेच पानफुटी सुंदर दिसते.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.