वर्धा, 30 डिसेंबर : आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये विरेचन ही एक उपचार पद्धती आहे. विरेचनाचे कार्य शरीरातील वात, पित्त आणि कफ या दोषांपैकी प्रामुख्याने पित्त ह्या दोषावर होते. विरेचन ही पित्ताने होत असलेल्या रोगांवरील श्रेष्ठ चिकित्सा सांगितली जाते. विरेचन म्हणजे नेमकं काय? ही चिकित्सा कशी असते? यासंदर्भातच वर्ध्यातील आयुर्वेदिक डॉक्टर मयूर कतोरे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
विरेचन म्हणजे नेमकं काय?
आयुर्वेद पंचकर्मातील एक महत्त्वाचं विशेष असं कर्म म्हणजेच विवेचन कर्म. हे विरेचन म्हणजे या विधीमध्ये काही जुलाब देणारी औषध रुग्णाला देऊन त्याच्या शरीरातील सासलेला दोष जुलाबाद्वारे बाहेर काढण्याच्या विधीला विरेचन असे म्हणतात. ही विरेचन क्रिया अत्यंत फायद्याची अशी आहे. जेव्हा काही व्याधी ही औषधी गुणांनी लवकर बरी होत नाही तेव्हा अशा प्रकारची शुद्धी क्रिया केल्याने त्या व्याधीला लवकरात लवकर आराम मिळवता येऊ शकतो, असं डॉक्टर मयूर कतोरे सांगतात.
हृदयरोग अन् किडनी स्टोनही होईल गायब, रोज करा हा प्राणायाम
आयुर्वेद शास्त्रात विरेचन महत्त्वपूर्ण क्रियापेकी ही एक क्रिया आहे. या ट्रीटमेंटमध्ये रुग्णाला प्रथमतः काही सिद्ध औषधीयुक्त तूप वैद्यमंडळी पिण्यास देतात. सोबतच त्या रुग्णाला मालिश आणि औषधी वनस्पती युक्त स्टीम दिले जाते. या कर्माला पूर्वकर्म असे म्हणतात. या पूर्वकर्मामुळे शरीर भर साचलेला पित्तदोष हा पोटामध्ये आणल्याची क्रिया पार पाडली जाते. पाच दिवस पूर्वकर्म झाल्यानंतर सहाव्या दिवशी रुग्णाला आराम दिला जातो. सातव्या दिवशी रुग्णास विवेचक औषधी दिल्या जातात. या औषधीनंतर रुग्णाला काही क्षणात लूज मोशन होण्यास सुरुवात होते. यामध्ये शहरातील सर्व घाण आणि पित्त दोष बाहेर काढण्यास मदत होते,असं डॉक्टर मयूर कतोरे सांगतात.
गळ्यासंदर्भातील सर्व आजार राहतील दूर; नियमित करा 'हा' प्राणायाम Video
या विरेचन क्रियेमुळे जवळपास 40 प्रकारचे पित्त दोष पित्तामुळे होणारे व्याधी जसे की, तोंडाला सतत फोड येणे, कावीळ पांडू आणि ऍनिमिया स्त्रियांचे गर्भाशय विषयीचे व्याधी तसेच वारंवार होणारी ऍसिडिटी शरीरात वाढणारी उष्णता कमी करण्यास उपचार पद्धती रामबाण आहे. विरेचन ही क्रिया आजारी व्यक्ती सोबत स्वस्थ व्यक्ती देखील करू शकतो. विरेचनासाठी योग्य काळ आहे शरद ऋतू म्हणजेच ज्याला आपण ऑक्टोबर हिट म्हणतो. या ऋतूमध्ये विरेचन कर्म सर्वांनी आवश्यक केले पाहिजे, असंही डॉक्टर मयूर कातोरे यांनी सांगितलं.
सर्दी, खोकलाच नाहीतर हृदयरोगही होईल गायब, हा प्राणायाम करून तर पाहा
तर पित्त दोषांच्या आजारांपासून मुक्तता मिळविण्यासाठी विरेचन ही आयुर्वेदातील एक चिकित्सा केली जाते. तर रुग्णाला पित्तदोष संदर्भातील आजार किंवा समस्या असल्यास आयुर्वेदातील विरेचन हा प्रभावी उपचार करून घेणंही फायद्याचे ठरेल.
(टीप : बातमीतील मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक आहेत. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. News18 मराठी त्याची हमी देत नाही.)