कांदे आणि बटाटे एकत्र का ठेवू नयेत?
कांदे आणि बटाट्यांचे साठवणुकीचे गुणधर्म वेगळे असतात. बटाटे अंधारात ठेवल्यास त्यावर हिरवा थर तयार होतो, ज्यामध्ये सॉलानिन निर्माण होते. जर हे बटाटे ओलसर कांद्यांच्या संपर्कात आले, तर सडण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते. एकत्र ठेवल्याने दोन्ही भाज्यांमध्ये उष्णता आणि ओलावा निर्माण होतो, जे विषारी घटक वाढवते.
advertisement
आरसा स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक; चमकवा अगदी नव्यासारखा, फक्त 'या' गोष्टी वापरा!
प्लास्टिक पिशवीत कांदे-बटाटे ठेवू नयेत
प्लास्टिक पिशवीत हवा खेळती राहत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दमट हवामानात पिशवीतील कांदे-बटाटे लवकर खराब होतात. प्लास्टिकमुळे ओलावा साचतो आणि बुरशी, कुज, वास यांचे प्रमाण वाढते. या प्रकारची भाजी खाल्ल्यास अपचन, उलट्या, आणि विषबाधा होऊ शकते.
पावसाळ्यात कांदे आणि बटाट्यांची काळजी कशी घ्यावी?
1) वेगळे ठेवा: कांदे आणि बटाटे वेगळ्या टोपल्या किंवा जाळीच्या पिशव्यांमध्ये ठेवा.
2) हवा खेळती ठेवा: दोन्ही भाज्यांना हवा खेळती राहील अशा ठिकाणी साठवा. अंधाऱ्या, थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवणे योग्य.
3) ओलसर कांदे/बटाटे बाजूला काढा: जर एखादा कांदा किंवा बटाटा ओलसर वाटत असेल तर तो तातडीने वेगळा करा.
4) नेहमी तपासा: आठवड्यातून एकदा तरी साठवलेले कांदे-बटाटे तपासा. कुजलेले किंवा मऊ झालेले भाग लगेच काढून टाका.
5) प्लास्टिकऐवजी जाळीच्या पिशव्या वापरा: पावसाळ्यात प्लास्टिक टाळा. जाळीच्या पिशव्यांमुळे हवा खेळती राहते.
सावधगिरी हीच सुरक्षा
पावसाळ्याच्या काळात साठवणुकीसाठी थोडी अधिक काळजी घेतल्यास अन्नविषबाधा, सडलेला भाजीपाला, वायफळ खर्च आणि आरोग्य धोक्यांपासून आपण वाचू शकतो. त्यामुळे घरातील महिलांनी आणि गृहिणींनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.