योग तज्ज्ञ डॉ. उभाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनाच्या एकाग्रतेसाठी आणि तणाव मुक्तीसाठी सर्वच योगासनांचा उपयोग होतो. यापैकी काही आसने आणि प्राणायाम मुलांच्या एकाग्रतेसाठी निश्चितपणे उपयोगी ठरतात. यामध्ये बालासन, पश्चिमोत्तानासन, वृक्षासन, विपरीतकरणी, शवासन या आसनांसह दीर्घ श्वसनाचे प्राणायाम देखील नियमित करण्याचा सल्ला योग तज्ज्ञ सांगतात.
advertisement
Ashadhi Wari 2025: जालना ते पंढरी सायकल वारी, 5000 वारकऱ्यांचं खास रिंगण, पाहा Video
मनःशांती साठी आणि मनाच्या एकाग्रतेसाठीची योगासने
1. बालासन
बालासनामध्ये सर्व शरीर सैल झालेले असते. रिलॅक्स झालेले असते. त्यामुळे मन शांत करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी बालासन उपयुक्त आसन आहे.
2. पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासनात मांड्या आणि पाठीचा कणा यांचा सुंदर व्यायाम होतो. त्यामुळे तणाव कमी होऊन मन शांत होते, एकाग्र होते.
3. वृक्षासन
वृक्षासनात संपूर्ण शरीराचे संतुलन साधले जाते. त्यामुळे मन एकाग्र होते आणि तणाव कमी होतो.4. विपरीतकरणीया आसनात पाय वरच्या दिशेने असतात. त्यामुळे रक्तप्रवाह खालच्या दिशेने म्हणजे मेंदूकडे होतो. त्यामुळे मन शांत व एकाग्र होऊन तणाव कमी होतो.
5.शवासन
शवासनात संपूर्ण शरीर सैल सोडून सर्व अवयवांवर क्रमाने लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे मन शांत आणि एकाग्र होऊन तणाव कमी होतो.
यासह दिर्घ श्वसणाचे काही प्राणायम करावेत.
यामध्ये संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित केले जाते. त्यामुळे मन शांत आणि एकाग्र होऊन तणाव कमी होण्यास मदत होते. पौष्टिक आहारासोबतच मुलांकडून योगतज्ञांच्या सल्ल्यानुसार काही आसने करून घेतली तर निश्चितच रोगप्रतिकार शक्ती आणि एकाग्रता वाढण्यासाठी मुलांना उपयोगी ठरतील.