हिवाळ्यात ओठ फाटणं, त्यातून रक्त येणं, ओठांना चिरा पडणं आणि ते कोरडे पडणं हे सामान्य आहे. शरीरातले पाणी कमी झाले, त्वचा कोरडी पडली किंवा व्हिटॅमिन्सची कमतरता निर्माण झाली तर अशा समस्या उद्भवतात. उत्तम आरोग्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन असणं गरजेचं असतं. ज्यावेळी व्हिटॅमिन कमी होतात तेव्हा ओठ फाटणे हे त्याचे पहिले लक्षण दिसून येते. युवक-युवतींमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. ओठ उलणं किंवा फाटणं हे व्हिटॅमिन बीची कमतरता असल्याचे संकेत असतात. शरीरावरील अन्य त्वचेच्या तुलनेत ओठाची त्वचा जास्त पातळ असते. त्यामुळे व्हिटॅमिन कमतरतेचा थेट आणि पहिला परिणाम ओठांवर दिसतो.जखम भरुन येण्यासाठी व्हिटॅमिन बी उपयुक्त ठरते. हे व्हिटॅमिन कमी झाले तर ओठ फाटतात.
advertisement
ब्रेड स्लाइसला का असतात छिद्र? जाणून घ्या नेमकं कारण
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. ओठात तयार होणाऱ्या नव्या पेशींच्या प्रक्रियेवरही त्याचा परिणाम दिसतो. व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे अॅनामिया होण्याचा धोका असतो. त्यामुळे ओठाची त्वचा कोरडी पडून ते फाटू लागतात.
व्हिटॅमिन बी 9 हे फॉलिक अॅसिड या नावाने ही ओळखले जाते. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं ओठ फाटणं, लिव्हरच्या समस्या आणि केस गळण्यास सुरूवात होते. ओठाची त्वचा मुलायम राहण्यासाठी व्हिटॅमिन बी 9 युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे.
Weight Loss : जिम आणि डायट शिवाय वजन कमी करायचंय? मग दररोज खा फक्त 'ही' एक गोष्ट
व्हिटॅमिन बी 6 च्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होता. शरीराचे चलनवलन योग्य पद्धतीनं होण्यासाठी हे व्हिटॅमिन एखाद्या बॅटरीप्रमाणं काम करतं. भूक, झोप आणि मूड चांगला राहण्यासाठी हे व्हिटॅमिन आवश्यक असतं. या समस्या निर्माण झाल्यातर त्याचे पहिले लक्षण ओठावर दिसते आणि ते फाटू लागतात.
ओठ फाटू नये तसेच ते कोरडे पडू नये यासाठी रोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. याशिवाय ओठांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. ओठ मॉश्चराईज्ड करण्यासाठी तुम्ही ओठांना खोबऱ्याचे तेल किंवा साजूक तूप लावू शकता. या दोन्हीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होतो.
ओठांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा आहे. ओठ फाटण्याची समस्या दूर करतील अशा पदार्थांचा आहारात समावेश केल्यास नक्कीच चांगला फरक पडू शकतो.