TRENDING:

Avocado खाण्याचे आहेत शेकडो फायदे; पण विकत घेताना चांगल्या दर्जाचं अवोकॅडो कसं ओळखायचं?

Last Updated:

पिकलेले आणि Mature Avocado कसे ओळखावे, हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण अवोकॅडो महाग फळ आहे. चांगले निघालेनाही तर नुकसान होते. शिवाय वाईट प्रतीचे फळ आरोग्याला हानीकारक ठरू शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: भारतीय बाजारात अवोकाडो हे फळ आता लोकप्रिय होत आहे. पण पिकलेले आणि Mature Avocado कसे ओळखावे, हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण अवोकॅडो महाग फळ आहे. चांगले निघालेनाही तर नुकसान होते. शिवाय वाईट प्रतीचे फळ आरोग्याला हानीकारक ठरू शकते. मग चांगलं अवोकॅडो कसे ओळखायचे? मुंबईच्या बाजारात अवोकाडोचा सरासरी दर 300 ते 500 रुपये प्रति किलो आहे. किरकोळ बाजारात 50- 60 रुपयांपासून 150-200 ला एक फळ या दराने अवोकॅडो विकलं जातं. त्यामुळे योग्य अवोकाडो निवडणे महत्त्वाचे आहे.
News18
News18
advertisement

चांगले पिकलेले अवोकॅडो ओळखण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत. पिकलेले अवोकाडो हातात धरल्यावर थोडे मऊ लागते, परंतु खूपच मऊ असल्यास ते जास्त पिकलेले असू शकते. अवोकाडोचा रंग गडद हिरवा किंवा जवळपास काळपट असतो. याशिवाय, देठाजवळील भाग थोडा हलकासा दाबून पाहिला असता मऊ असणे आवश्यक आहे, याचा अर्थ तो खाण्यास योग्य आहे. जर तो भाग अजून कठीण असेल तर अवोकाडो कच्चे असू शकते. काही अवोकाडो पिकण्यासाठी 2-3 दिवस घरात ठेवले तरी चालतात.

advertisement

तीव्र सुगंधी परफ्यूमपासून सावधान! कनौजच्या व्यापाऱ्यांनी सांगितलं अस्सल अत्तर कसं ओळखायचं?

आरोग्याच्या दृष्टीने अवोकाडो अत्यंत पौष्टिक फळ मानले जाते. यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. याशिवाय, अवोकाडोमध्ये असलेले व्हिटॅमिन ई, पोटॅशियम आणि फॉलिक अॅसिड हे शरीराच्या इतर गरजा पूर्ण करतात. हे फळ वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे, कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. याशिवाय, अवोकाडोमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

advertisement

मुंबईत आणि इतर मोठ्या शहरांमध्ये आता अवोकाडोची मागणी वाढली आहे, कारण लोक त्याचे आरोग्यविषयक फायदे ओळखू लागले आहेत. त्यामुळे योग्य आणि पिकलेले अवोकॅडो निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Avocado खाण्याचे आहेत शेकडो फायदे; पण विकत घेताना चांगल्या दर्जाचं अवोकॅडो कसं ओळखायचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल