TRENDING:

Morning Routine : हिवाळ्यात व्यायाम करणं टाळू नका, थंडीतही व्यायाम सुरु ठेवण्यासाठी या टिप्सचा होईल उपयोग

Last Updated:

हिवाळ्यात नियमित व्यायाम करणं थोडं कठीण असतं. पण, दिनचर्येत थोडा व्यायाम केल्यानं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि दिवसभर ऊर्जावान वाटण्यास मदत होऊ शकते. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळ्यात, दिनचर्येतले बदल, खराब आहार, झोपेची कमतरता, प्रदूषण आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे अनेकांना शारीरिक आणि मानसिक आजार होतात. हे टाळण्यासाठी, योगा आणि व्यायामात सातत्य असणं आवश्यक आहे. हिवाळ्यात काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
News18
News18
advertisement

हिवाळ्यात नियमित व्यायाम करणं थोडं कठीण असतं. पण, दिनचर्येत थोडा व्यायाम केल्यानं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि दिवसभर ऊर्जावान वाटण्यास मदत होऊ शकते.

सकाळी उठल्यानंतर एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्या. थोडं चालत जा आणि थोडा हलका व्यायाम करा.

सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याची सवय असेल तर रिकाम्या पोटी चहा पिणं टाळा. नेहमी आधी कोमट पाणी प्या.

advertisement

योगाची सुरुवात सूर्यनमस्कारानं करावी. थोड्या विश्रांतीनंतर कपालभाती करावी. भ्रमरी, भ्रास्तिक, भुजंगासन, अधोमुख आसन, पवनमुक्तासन आणि शवासन या ऋतूमधे प्रभावी ठरतात. सध्या प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतंय, यासाठी वातानिती, कपालभाती आणि जल नेती हे प्रदूषणाच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करतात. योगाभ्यासातले व्यायाम करण्याची योग्य पद्धत माहित नसेल तर प्रशिक्षकांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Colon Cancer : कोलन कॅन्सर म्हणजे काय ? हा कर्करोग कशामुळे होतो ?

advertisement

हिवाळ्यात भूक जास्त लागते. म्हणून, संतुलित आहार घ्यावा. नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे सर्व आरोग्यदायी असलं पाहिजे. यामुळे थकवा, आळस आणि अशक्तपणा कमी होईल. त्यामुळे ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल.

रात्री झोपण्यापूर्वी, कोमट पाण्यानं पाय, हात आणि तोंड धुवा. झोपण्यापूर्वी आरामात बसून दहा वीस वेळा अनुलोम-विलोम करा. यामुळे चांगली झोप येईल. यात पाण्यानं नाक स्वच्छ करण्यासाठीचा एक उपाय आहे.  सायनसच्या समस्या, सर्दी आणि प्रदूषणावर उपचार करण्यासाठी हा उपाय केला जातो. एका नाकपुडीत पाणी घातलं जातं आणि दुसऱ्या नाकपुडीतून नेती पात्र वापरून बाहेर काढलं जातं पण हे नेहमी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली किंवा योग्य प्रशिक्षण घेऊन करणं गरजेचं आहे.

advertisement

- नियमितपणे योगाभ्यास करत असाल तर रिकाम्या पोटी किंवा हलक्या पोटी करा. थोडं कोमट पाणी पिऊ शकता.

- योगा नंतर वीस -तीस मिनिटांनी आंघोळ करा. योगा केल्यानंतर अर्ध्या तासानं काहीतरी खा.

- योगनिद्रा आसनांचा सराव करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, मन शांत होतं आणि श्वासोच्छवासाच्या समस्या कमी होतात.

- हिवाळ्यात तहान कमी लागते. पाण्याअभावी डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो.

advertisement

- तुमच्या नैसर्गिक वेगानं व्यायाम करा. स्वतःवर जास्त दबाव येऊ देऊ नका. श्वास घ्यायला त्रास होत असेल, अस्वस्थता किंवा वेदना होत असतील तर सावध रहा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

- स्वतःला आव्हान देऊन कमी व्यायामानं सुरुवात केली तरी, आरोग्यात हळूहळू लक्षणीय बदल दिसून येतील. शरीराला अंतर्गत तापमान नियंत्रित करण्यासाठी आणि उष्णता किंवा ऊर्जा राखण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते.

- प्रत्येकानं वजनानुसार कॅलरीज बर्न केल्या पाहिजेत. त्यासाठी, दररोज व्यायामाचं नियोजन करणं फायदेशीर ठरू शकतं.

- फिटनेससाठी, जिममधेच जाण्याची गरज नाही. व्यायामामध्ये जॉगिंग, सायकलिंगचाही समावेश असू शकतो. चालणं, धावणं किंवा एखादा खेळ खेळणं देखील उपयुक्त ठरतं.

- हिवाळ्यात वजन नियंत्रित करण्याचा विचार करत असाल, तर हा चांगला काळ आहे. काही HIIT - high intensity interval training करून पहा. सात किंवा आठ वेगवेगळे व्यायाम एकत्रित करता येतील अशी 30-मिनिटांची किंवा 15-मिनिटांची सायकल तयार करा.

Skin Toner : नैसर्गिक टोनर बनवण्यासाठी DIY कृती, त्वचेचा पोत राहिल चांगला

हिवाळ्यातील व्यायामाचे फायदे -

- रोगप्रतिकारक शक्ती - व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि फ्लूसारख्या हिवाळ्यातील आजारांना प्रतिबंधित करण्यास मदत होते.

- ऊर्जा - व्यायामामुळे रक्ताभिसरण वाढतं, ज्यामुळे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा पुरवठा होण्यास मदत होते. यामुळे थकवा कमी होतो आणि ऊर्जा वाढते.

- मूड सुधारतो - नियमित व्यायामामुळे एंडोर्फिनचं उत्सर्जन वाढतं.

- वजन कमी करण्यासाठी उपयुक्त - हिवाळ्यात जास्त तेल, तूप आणि जड पदार्थ खाल्ल्यानं वजन वाढू शकतं. व्यायाम केल्यानं वजन व्यवस्थापनात मदत होऊ शकते.

- दीर्घकालीन आजारांचा धोका कमी - नियमित व्यायामामुळे हृदयरोग आणि कर्करोगासारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका देखील कमी होऊ शकतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा उलथापालथ, मंगळवारी कांदा आणि मक्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

- झोपेची गुणवत्ता सुधारते - झोपेचा त्रास होत असेल तर नियमित व्यायाम केल्यानं झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होऊ शकते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Morning Routine : हिवाळ्यात व्यायाम करणं टाळू नका, थंडीतही व्यायाम सुरु ठेवण्यासाठी या टिप्सचा होईल उपयोग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल