सुरण ही भाजी जमिनीखाली उगवते आणि ती एकदा पेरली की वर्षानुवर्षे उगवत राहते. सुरणच्या भाजीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, बीटा कॅरोटीन, जीवनसत्त्वे, खनिजे, कॅलरीज, चरबी, कर्बोदके, प्रथिने, पोटॅशियम आणि विद्राव्य फायबर पुरेशा प्रमाणात आढळतात. त्यामुळेच जमिनी खाली उगवणाऱ्या भाज्यांमध्ये सुरण सर्वात सर्वात पौष्टिक आहे.त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. ग्लायसेमिक इंडेक्समुळे ते मधुमेह आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.
advertisement
Dog Bite Treatment : कुत्रा चावल्यावर सर्वात आधी करा 'ही' गोष्ट, डॉक्टरांनी सांगितला उपाय
सुरणाच्या भाजीत भरपूर फायबर असते. त्यामुळे ही भाजी वजन कमी करण्यास मदत करत असून शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करते. परंतु सुरणाला योग्य प्रकारे शिजवणे महत्वाचे आहे. सुरणातील काही तंतू पोटासाठी देखील फायदेशीर आहेत. यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते जे कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते. कमी चरबी आणि उच्च फायबर सामग्रीमुळे, ते वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते.
सुरणाची भाजी ताणतणाव कमी करण्यास मदत करते. यात व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, आयरन, इत्यादी पोषकतत्व असतात. जे शरीराला ऊर्जा प्रदान करतात आणि तुम्हाला सकारात्मक ठेवण्यास मदत करतात. सुरणचा उपयोग आयुर्वेदिक औषधी म्हणून देखील केला जातो यामुळे तणाव, चिंता दूर होते.