Dog Bite Treatment : कुत्रा चावल्यावर सर्वात आधी करा 'ही' गोष्ट, डॉक्टरांनी सांगितला उपाय
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
सध्या कुत्रा चावल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. रस्त्यावरील किंवा अनेकदा पाळीव कुत्रे देखील अग्रेसिव्ह झाल्यावर हल्ला करतात यात अनेक लोक या हल्लयाचे शिकार होतात. तेव्हा कुत्रा चावल्यानंतर तातडीने कोणते प्रथमोपचार करावे याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत.
advertisement
कोणत्याही केमिस्टच्या दुकानात कुत्रा चावल्यानंतर तातडीने देण्यात येणारी अँटी सीरमसुद्धा उपलब्ध असते. रेबीजच्या व्हायरसपासून बनवण्यात आलेली अँटी सीरम तुम्हाला कोणत्याही केमिस्टच्या दुकानात मिळू शकते. हे सीरम डॉक्टर तुमच्या जखमेच्या आजूबाजूला टोचतात. हा उपचार तातडीने करणे गरजेचे आहे. या उपचारासाठी अधिक दिवस लावल्यास धोका वाढू शकतो. तेव्हा ज्या दिवशी कुत्रा चावला आहे त्या दिवशीच सीरम टोचणे आवश्यक आहे. कुत्रा चावल्यानंतर लगेच 15-20 मिनिटांमध्ये हे सीरम टोचले तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.
advertisement
advertisement
कुत्रा चावल्यानंतर अँटी रेबीज कोर्स घेणेही आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी पोटामध्ये 14 इंजेक्शन घ्यावी लागत होती. परंतु आता ही इंजेक्शन तुम्ही हातावर किंवा दंडामध्ये देखील घेऊ शकता. कुत्रा चावल्यावर आता तुम्हाला सहा इंन्जेक्शनचा कोर्स पूर्ण करावा लागतो. हे सर्व उपचार केल्यामुळे कुत्र्याच्या व्हायरसपासून होणारा रेबीज रोग आपल्याला टाळता येतो.


