TRENDING:

Kitchen Jugad : वॉशिंग मशीनमध्ये टाका थंड-थंड दही, झटपट होईल कमाल; पाहून म्हणाल, 'वाह मजा आ गया'

Last Updated:

मार्केटमध्ये अनेक प्रकारची पोर्टेबल वॉशिंग मशीन्स उपलब्ध आहेत. त्यांची क्षमता 9 लिटरपर्यंत आहे. हे मशीन सहसा कपडे धुण्यासाठी वापरलं जातं. पण त्याचा वेगळ्यापद्धतीनेही तुम्ही वापर करु शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : थंड लस्सी प्यायली तर ताजंतवानं वाटतं. काही घरांमध्ये लस्सी हे प्रचंड आवडीचं पेय आहे. जास्त व्यक्तींसाठी लस्सी बनवणं थोडं कष्टाचं काम आहे. यावरदेखील काही जणांनी उपाय शोधून काढला आहे. वॉशिंग मशीनच्या मदतीने लस्सी तयार केली जात असल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पोर्टेबल वॉशिंग मशीनच्या मदतीने तुम्ही 10 ग्लास लस्सी सहज बनवू शकता. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

मार्केटमध्ये अनेक प्रकारची पोर्टेबल वॉशिंग मशीन्स उपलब्ध आहेत. त्यांची क्षमता 9 लिटरपर्यंत आहे. हे मशीन सहसा कपडे धुण्यासाठी वापरलं जातं; पण याचा वापर तुम्ही लस्सी बनवण्यासाठीदेखील करू शकता. हे लहान वॉशिंग मशीन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सहज हलवता येतं. जे लोक लहान अपार्टमेंटमध्ये राहतात, प्रवास करतात किंवा कॅम्पिंगला जातात त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. त्याचा आकार खूपच लहान आहे आणि वापरल्यानंतर ते सहजपणे फोल्ड केलं जाऊ शकतं. फोल्ड केल्यानंतर ते प्लेटसारखं दिसतं. या मशीनच्या निर्मितीमध्ये टीआरपी मटेरियलचा वापर झाला आहे.

advertisement

या फोल्डेबल वॉशिंग मशीनमध्ये सहज लस्सी सहज बनवता येते. मशीनमध्ये दही, पाणी, साखर आणि थोडा बर्फ घालायचा आहे. इच्छा असल्यात त्यात केशर घालून 'केशर लस्सी'देखील बनवू शकता. ज्यांना गुलाब आवडतो ते त्यात रूआफजा घालून गुलाब फ्लेवरची लस्सी बनवू शकतात.

सगळं साहित्य मशीनमध्ये टाकून ते ऑन करताच आतला स्पिनर काम करतो. असं म्हणतात, लस्सी जितकी जास्त वेळ घुसळली जाईल तितकी ती जास्त घट्ट बनते. यामध्ये टाइम सेट करण्यासाठी तीन बटणं आहेत. तुम्ही गरजेनुसार टाइम सेट करू शकता. लस्सी बनवल्यानंतर त्यात पाणी घालून आणि फिरवून हे मशीन सहज स्वच्छ करता येतं. हे पोर्टेबल वॉशिंग मशीन अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर 1500 ते 2000 रुपयांच्या प्राइस रेंजमध्ये उपलब्ध आहे. तुम्हीदेखील लस्सीचे चाहते असाल आणि घराच्या घरी लस्सी बनवण्याची इच्छा असेल तर या मशीनचा वापर करता येईल.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Jugad : वॉशिंग मशीनमध्ये टाका थंड-थंड दही, झटपट होईल कमाल; पाहून म्हणाल, 'वाह मजा आ गया'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल