TRENDING:

आकर्षक निमंत्रण पत्रिका टाकून देताय? अर्ध्या तासात बनवा सुंदर फ्लॉवर पॉट, Video

Last Updated:

आकर्षक निमंत्रण पत्रिकांच्या पुठ्ठ्यापासून खास वस्तू बनवून आपलं घर सजवता येऊ शकतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमिता शिंदे, प्रतिनिधी
advertisement

वर्धा: आपल्याकडे एखादा कार्यक्रम, विवाह सोहळा यांच्या निमंत्रण पत्रिका खूप आकर्षक बनवल्या जातात. पण नंतर या पत्रिका कचऱ्यातच जातात. पण याच पत्रिकांच्या पुठ्ठ्यापासून खास वस्तू बनवून आपलं घर सजवता येऊ शकतं. वर्धा येथील कलाकार निखिल सुशीला मोरेश्वर यांनी याच पत्रिकांच्या पुठ्ठ्यापासून आकर्षक फ्लॉवर पॉट कसा बनवायचा? हे दाखवलं आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची ही कल्पना आपल्यालाही नक्कीच आवडेल.

advertisement

अशी तयार करा बेस्ट वस्तू

सर्वप्रथम एखाद्या सुंदर डिजाईन असलेल्या पत्रिकेला चौकोनी आकारात कापून घ्या. आता शेंगदाणेसाठी करतो तशी किंवा फुलांचे बुके असतात त्या आकारात दुमडून घ्या. त्याला हॉट ग्लु किंवा शक्यतो स्टेपलर लावून सिक्युर करून घ्या. आता त्याला स्टॅन्ड तयार करायचं असल्यामुळे त्याला खालून थोडं कट करून घ्या. आता त्याच डिजाईनच्या पत्रिकेचा तुकडा घेऊन गोल आकारात कापून घ्या. सेंटरपर्यंत कात्रीने कट करा. आता थोडं दुमडून स्टेपलर पिन लावून घ्या. आता त्यावर फेविकॉल किंवा 'हॉट ग्लू'च्या साह्याने कोन चांगला चिटकवून घ्या.

advertisement

हटके लूकसाठी हँडक्राफ्ट ज्वेलरीला मागणी, PHOTOS पाहाल तर प्रेमात पडाल

अशी तयार करा फुलं

आता फुलं बनविण्यासाठी सर्वप्रथम पत्रिका आयताकृती कापून त्याला दुमडून पेन्सिलने मार्क करा. बारीक बारीक लांब कट करून घ्या. आता उलट करून एकीकडे फेविकॉल लावून घ्या. आता तयार केलेल्या दांडीवर वरून खाली अशाप्रकारे चिटकवून घ्या. अशी 4-5 फुले तयार करा आणि वेगवेगळ्या आकाराची फुले तुम्ही तयार करू शकता. आता त्या फ्लॉवर पॉट ला डेकोरेशन करू शकता. त्यात ही फुले ठेवून फ्लॉवर पॉट तयार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

कागदी पुठ्ठ्यांचा हा सुंदर फ्लॉवर पॉट अवघ्या अर्धा तासात बनून तयार होतो. अशाच अनेक आकर्षक दिसणाऱ्या पत्रिका टाकून देण्यापेक्षा कोणाला तरी भेट म्हणून देण्यासाठी किंवा घरी शोभेची वस्तू म्हणून ठेवण्यासाठी विविध वस्तू आपण तयार करू शकतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
आकर्षक निमंत्रण पत्रिका टाकून देताय? अर्ध्या तासात बनवा सुंदर फ्लॉवर पॉट, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल