TRENDING:

Morning Headache : सकाळी होणाऱ्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करु नका, असू शकतो मेंदूमध्ये पाणी झाल्याचे संकेत, हे 5 लक्षण दिसताच सावध व्हा

Last Updated:

जर ही डोकेदुखी रोजचीच झाली असेल, तीव्र स्वरूपाची असेल आणि इतर काही लक्षणांसोबत दिसत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अनेकांना सकाळी उठल्यावर सौम्य स्वरुपाची डोकेदुखी जाणवते. लोक याला तणाव किंवा अपूऱ्या झोपेचे परिणाम समजून दुर्लक्ष करतात किंवा कधी एखादी डोकेदुखीची गोळी खाऊन तात्पूर्ता आराम मिळवतात. पण तुम्हाला माहितीय का की अशाप्रकारची सकाळची डोकेदुखी सतत होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही कारण हे गंभीर आजाराचं लक्षण आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

विशेषतः जर ही डोकेदुखी रोजचीच झाली असेल, तीव्र स्वरूपाची असेल आणि इतर काही लक्षणांसोबत दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. अशीच एक गंभीर स्थिती म्हणजे हायड्रोसेफॅलस म्हणजेच मेंदूमध्ये पाणी साचणं आहे.

खरंतर मेंदूमध्ये पाणी साचण्याच्या या आजाराला हायड्रोसेफॅलस म्हणतात. पण हायड्रोसेफॅलस नक्की काय? हे जाणून घेऊ आणि मग लक्षणंही जाणून घेऊ

advertisement

हायड्रोसेफॅलस म्हणजे काय?

ही एक न्यूरोलॉजिकल अवस्था आहे, ज्यामध्ये सेरेब्रल स्पायनल फ्लुइड (CSF)  मेंदू आणि  मणक्याभोवतालचं द्रव  गरजेपेक्षा जास्त प्रमाणात तयार होतो किंवा त्याचा प्रवाह अडतो. त्यामुळे मेंदूच्या आतील व्हेंट्रिकल्समध्ये हा द्रव साचतो आणि परिणामी मेंदूवर दाब वाढतो. ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते – नवजात बाळांपासून ते वृद्धांपर्यंत.

हायड्रोसेफॅलसची ५ प्रमुख लक्षणं

advertisement

सकाळी तीव्र डोकेदुखी – दररोज सकाळी उठताना होणारी असह्य डोकेदुखी हे सुरुवातीचं संकेत असू शकतं.

मळमळ आणि उलटी – डोकेदुखीबरोबर मळमळ किंवा उलटी होणं द्रव साचल्यामुळे होणाऱ्या दबावाचं लक्षण आहे.

नजरेची अडचण – धुसर दिसणं, डबल दिसणं किंवा डोळ्यांच्या हालचालींत अडचण.

चालण्यात बदल – पाय जड वाटणं, संतुलन बिघडणं, विशेषतः वृद्धांमध्ये हे लक्षण स्पष्ट दिसते.

advertisement

वर्तन आणि विचारशक्तीत बदल – चिडचिड, विसरभोळेपणा, मानसिक थकवा जाणवणं.

वेळीच उपचार गरजेचं

हायड्रोसेफॅलसचे निदान लवकर झाले तर शस्त्रक्रिया किंवा ‘शंट’ ट्रीटमेंटद्वारे मेंदूतील द्रवाची योग्य मात्रा राखता येते. उशीर झाल्यास मेंदूचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते आणि मृत्यूचीही शक्यता निर्माण होते.

दररोज सकाळी तीव्र डोकेदुखी होत असेल, तर फक्त पेनकिलर गोळ्या घेण्याऐवजी तज्ञांचा सल्ला घ्या. मेंदूचं आरोग्य हे तुमचं आयुष्य सुरक्षित ठेवू शकतं.

advertisement

(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Morning Headache : सकाळी होणाऱ्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करु नका, असू शकतो मेंदूमध्ये पाणी झाल्याचे संकेत, हे 5 लक्षण दिसताच सावध व्हा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल