TRENDING:

ऋषीपंचमीला असते ‘या’ खास भाजीचे महत्त्व, पाहा कारण आणि बनवण्याची योग्य पद्धत

Last Updated:

21 भाज्या एकत्र करुन ऋषीपंचमीच्या दिवशी खास भाजी करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली, 19 सप्टेंबर : गणेशोत्सवाचे दहा दिवस प्रत्येक घरात चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. प्रत्येक दिवसाचं खास असं महत्त्व असतं. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते. या दिवशी ऋषीची भाजी केली जाते. ही भाजी का आणि कशापद्धतीनं करतात याची माहिती डोंबिवलीच्या सुचिता माने यांनी दिली आहे.
News18
News18
advertisement

काय आहे उद्देश?

ऋषीमुनी म्हणजे आपले पूर्वज अशी मान्यता आहे. या ऋषींचे स्मरण असावे. आपल्या संस्कृतीच्या वैभवशाली परंपरेचं कधीही विस्मरण होऊ नये म्हणून ऋषी पंचमी साजरी केली जाते. या दिवशी नदीतून किंवा समुद्रातून सात खडे आणले जातात. ते खडे पाटावर ठेवले जातात. आघाडाच्या पानांची 21 देठ त्या सात खड्यांवर ठेवली जातात. त्यांची पूजा केली जाते.त्यानंतर केळीच्या पानावर नैवेद्य दाखवला जातो.

advertisement

फक्त 10 मिनिटात बनवा पनीर मलई मोदक, पाहा सोपी रेसिपी

वर्षातून एकदा तरी बैलाला आराम मिळावा यासाठी स्वयंपाक करताना स्वतः कष्टाने पिकवलेल्या भाज्यांची भाजी करण्याची प्रथा आहे.  ऋषी-मुनी कंदमूळ खाऊन जगत होते. त्याचबरोबर ते स्वतः हाताने पिकवून भाज्या खात असत. त्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी होते असे सांगितले जाते. ऋषीपंचमीच्या दिवशी देखील बैलाने केलेल्या नांगरणीतून तयार झालेले अन्न यादिवशी खात नाहीत अशी माहिती माने यांनी दिली.

advertisement

कशी करतात भाजी?

वाल पापडी म्हणजेच श्रावण घेवडा, लाल भोपळा, देठा सकट भाजीचा अळू, बटाटा, रताळे, अर्वी, देठा सकट लाल माठ, पडवळ, दोडका, शेवग्याची शेंग, खोबरं, फरसबी, शेंगदाणे, हिरवी मिरची, मका, भेंडी, काकडी, गाजर, काटेकंद, मटार, पालक, चिंचेचा कोळ या भाज्या एकत्र करून ही ऋषीची भाजी करतात.

पौष्टीक नाचणी सत्वाच्या मोदकाचा बाप्पाला दाखवा नैवेद्य, पाहा सोपी रेसिपी

advertisement

या सर्व भाज्या धुवून चिरून घ्यावा लागतात. कढईत थोडस तेल घालावे. त्यानंतर हिरवी मिरची घालून अळूची पाने आणि लाल माठ टाकावा. या भाज्या थोड्या शिजल्या की हळू हळू कढईत टाकाव्या. त्यानंतर त्या भाज्या शिजण्यासाठी साधारण दोन पेले पाणी घालून (भाज्यांच्या प्रमाणानुसार) व्यवस्थित शिजू द्यावे. कुकरमध्येही शिजवू शकता. एक शिटी घेतली की भाज्या व्यवस्थित शिजतात. त्यानंतर त्यामध्ये कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ आणि मीठ घालुन भाजी थोडी शिजवावी. यामध्ये पाण्याच्या ऐवजी तुम्ही नारळाचे दूध देखील घालू शकता. ही भाजी करताना जिरं किंवा मोहरीची फोडणी देत नाहीत, अशी माहिती सुचिता माने यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
ऋषीपंचमीला असते ‘या’ खास भाजीचे महत्त्व, पाहा कारण आणि बनवण्याची योग्य पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल