शाही व्हेज कुर्मासाठी लागणारे साहित्य
फुलकोबी, गाजर, बटाटा, वाटाणा, शिमला मिरची, पनीर, काजू, तेल, भाजलेले सुके खोबरे, कांदे, टोमॅमटो, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे, तमालपत्र, हळद, हिंग, गरम मसाला, धने-जिरे पावडर, लाल तिखट, कांदा-लसूण मसाला आणि मीठ चवीनुसार हे साहित्य लागेल.
advertisement
शाही व्हेज कुर्मा कृती
फ्लॉवर, गाजर आणि बटाट्याचे छोटे तुकडे करून स्वच्छ धुवून थोडंसं मीठ घालून 7–8 मिनिटे शिजवून घ्या. वाटणासाठी भाजलेलं सुके खोबरे, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि मगज बी थोड्या पाण्यासह बारीक वाटून घ्या. कढईत तेल गरम करून जिरे आणि तमालपत्राची फोडणी द्या. त्यात तयार वाटण घालून तेल सुटेपर्यंत परता. नंतर हिंग, हळद आणि कांदा–लसूण मसाला घालून मिक्स करा.
शिजलेल्या भाज्या, शिमला मिरची, मटार आणि पनीर घालून हलक्या हाताने मिसळा. गरम पाणी टाकून उकळी आणा आणि चवीनुसार मीठ, तिखट, गरम मसाला आणि धने–जिरे पावडर घालून मिसळा. शेवटी काजू घालून 10–15 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल शाही व्हेज कुर्मा पटकन तयार होतो.





