छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू झाला की थंड काही तरी पिण्याची इच्छा होतेच. बऱ्याचदा बाहेरील थंड पदार्थ घेतल्याने आजारी पडण्याचा धोका असतो. तेव्हा घरातच एखादा आरोग्यदायी ज्यूस बनवणं लाभदायी ठरू शकतं. त्यासाठी टरबूज आणि डाळिंबाचा ज्यूस एक उत्तम पर्याय आहे. आरोग्यासाठी लाभदायी असणारा हा ज्यूस बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मेघना देशपांडे यांनी याबाबत माहिती दिलीय.
advertisement
ज्यूससाठी लागणारे साहित्य
एका टरबुजाचे काप करून घ्यायचे. एक डाळिंब, वाळलेली पुदिना पाने, चाट मसाला, काळं मीठ, बीटचा खिस, भिजत ठेवलेले सब्जा बी हे साहित्य लागेल. तसेच सोडा, स्प्राईट किंवा सेवनअप सारखे कोल्ड ड्रिंक्स देखील तुम्ही घेऊ शकता.
उन्हाळ्यात बनवा चटपटीत काकडी चाट, अगदी 5 मिनिटांत रेसिपी तयार, Video
कसा बनवायचा डाळिंबाचा ज्यूस?
सर्वप्रथम हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. यामध्ये सर्वप्रथम टरबूजचे काप टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये डाळिंब टाकायचं. त्यानंतर वाळलेली पुदिनाचे पाने, काळे मीठ आणि बीट हे सर्व साहित्य टाकायचं. साहित्याचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता. हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर मिक्सर स्पीड कमी ठेवून हे सर्व ब्लेंड करून घ्यायचं.
उन्हाळ्यात फ्रीजमधील थंड फळे खाणं योग्य की अयोग्य? पाहा आहारतज्ज्ञांचा सल्ला
टरबूज आणि डाळिंब बारीक केल्यावर त्यांचा रंग बदलतो. त्यामुळे यात बिटाचा वापर केला जातो. तसेच आपल्याला ज्यूस गोड हवा असेल तर काही प्रमाणात साखर घातली तरी चालेल. मिक्सर मधून हे सर्व साहित्य काढून घेतल्यानंतर ते गाळून घ्यायचं. त्यामुळे त्यात कोणताही बी राहत नाही. सर्व्ह करण्यासाठी एका ग्लासमध्ये थोडेसे आईस क्यूब टाकायचे. त्यानंतर हे तयार केलेलं सर्व ज्यूस त्यामध्ये टाकायचं. त्यात सोडा किंवा इतर कोल्डड्रिंक घालायचं. चव येण्यासाठी थोडासा चाट मसाला टाकायचा. अशा सोप्या पद्धतीने ही खास रेसिपी झटपट बनवता येते, असे देशपांडे सांगतात.