लोह म्हणजे आयर्नच्या कमतरतेमुळे, विशेषतः चेहरा, फिकट होतो. हा फिकटपणा ओठ, हिरड्या, पापण्या आणि नखांवरही दिसून येतो. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे रक्ताचा लाल रंग फिकट होतो त्यामुळे याचे परिणाम त्वचेवर जाणवतात.
Processed Food: चिप्स, बिस्किटं खाताय ? आताच व्हा सावध, वाचा सविस्तर
लोहाच्या कमतरतेमुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे पेशी पुन्हा निर्माण होत नाहीत. यामुळे त्वचेतला ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी, निर्जीव आणि खडबडीत होते.
advertisement
लोहाच्या कमतरतेमुळे त्वचेला खाज येऊ शकते. ही खाज शरीराच्या विशिष्ट भागात किंवा संपूर्ण शरीरावर जाणवू शकते.
केस गळणं : लोहाच्या कमतरतेमुळे केसांच्या रोमांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही. यामुळे केस कमकुवत होतात, ज्यामुळे केस तुटणं आणि केस गळणं सुरू होतं. यामुळे नेहमीपेक्षा जास्त केस गळू शकतात आणि संपूर्ण टाळू पातळ होऊ शकते.
नखं कमकुवत होणं - लोहाच्या कमतरतेमुळे नखं कमकुवत होतात आणि सहजपणे तुटतात. कोइलोनिचिया - यात नखं मध्यभागी सपाट होतात आणि कडा वर येतात, ज्यामुळे नखं चमच्यासारखी दिसतात.
Eye Care: डोळे कोरडे होतात ? समजून घ्या कारणं, उपचारांची पद्धत
लोहासोबतच, आहारात व्हिटॅमिन सीची देखील काळजी घ्या, कारण लोह शोषण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. लोहाच्या कमतरतेची लक्षणं जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लोह पूरक आहार स्वतः घेऊ नका, कारण जास्त लोहाचं प्रमाण हानिकारक असू शकतं.
