हे सुद्धा वाचा : International men's day 2024: पुरूषांसाठी सर्वोत्तम फळं जी ठेवतील फिट आणि उत्साही
ज्यूस पिणं का धोक्याचं ?
आहारतज्ज्ञांच्या मते, फळांचा रस पिण्यापेक्षा फळं खाणं केव्हाही चांगलं. तुम्हाला जर आठवत असेल तर तुमच्या घरातल्या जुन्याजाणत्या व्यक्ती सर्दी झाल्यावर पेरू खाण्याचा सल्ला द्यायचे. याशिवाय असंही म्हटलं जातं की, एक पूर्ण पेरू एकाच व्यक्तीने खाल्ला तर त्याला सर्दी होत नाही. कारण पेरूमध्ये अशा काही बिया असतात ज्या आरोग्यासाठी फायद्याच्या असतात. त्यामुळे संपूर्ण पेरू खाणाऱ्या व्यक्तीला त्या पेरूचे लाभ मिळू शकतात. मात्र जर हाच पेरू वाटून खाल्ला तर त्या पेरूचे लाभ मिळू शकणार नाही. फळांचंही तसंच आहे. फळांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वं, खनिजं, अँटिऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल्स आणि फायबर्स असतात. मात्र जेव्हा आपण फळांचा रस बनवतो तेव्हा फळांमधली ही पोषकत्त्वे आणि फायबर्स चोथ्याच्या रुपाने बाहेर टाकली जातात. त्यानंतर त्या फळाच्या उरतं ते फक्त पाणी आणि साखर. त्यामुळे फळाचं रस प्यायल्याने फायदा होण्याऐवजी नुकसानच होऊ शकतं.
advertisement
फळांचा रस काढतानाही प्रक्रिया तुम्ही नीट बघत असाल तर ज्यूस काढताना त्याचा कडकटपणा दूर व्हावा म्हणून खूप प्रमाणात पिठीसाखर साखर टाकली जाते. आता विचार करा. ज्यूसमुळे फळातली पोषकतत्वं आधीच बाहेर टाकली गेली आहेत. त्यात अजून साखर घातल्यामुळे तुमच्या रक्तातली साखर किती वाढली असेल याचा विचार करा. त्यामुळे फळाचा रस किंवा ज्यूस पिण्यापेक्षा फळं खाणं केव्हाही चागलं. कारण फळातल्या पोषकतत्वांमुळे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहाते.
हे सुद्धा वाचा :Avoid Fruits at Night: रात्री ‘ही’ फळं खात आहात? आत्ताच सावध व्हा, फायद्याऐवजी होईल नुकसान
या फळांचा ज्यूस कधीच पिऊ नका
सफरचंद
रोज एक सफरचंद खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातं. सफरचंदात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, मँगनीज आढळतात. त्यामुळे संपूर्ण सफरचंद खाणं फायद्याचं ठरतं. त्याचा सफरचंदाचा ज्यूस पिण्याची चूक करू नका.
हे सुद्धा वाचा :
संत्री
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळते.त्यामुळे संत्री खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. मात्र संत्र्याचा ज्यूस काढल्यामुळे फायबर बाहेर टाकले जातात आणि फक्त त्यात फळातली शर्करा उरते. त्यामुळे संत्र्याच्या रसामुळे रक्तातल्या साखरेची पातळी वेगाने वाढते.
अननस
अननसात भरपूर जीवनसत्त्वं, खनिजं, अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, कॉपर, फायबर असतात. त्यामुळे पूर्ण अननस खाणं फायद्याचं ठरतं. अननसाचा ज्यूस प्यायल्याने मधुमेहाचा धोका वाढतो.
तुम्हाला जर फळं खायला आवडत नसतील आणि फक्त फळांचा ज्यूस आवडत असेल तर कलिंगड, पेरू, चिकू, अशा फळांच्या रसासोबत, बीटरूट,गाजर यांचा ज्यूस तुम्ही पिऊ शकता.