International men's day 2024: पुरूषांसाठी सर्वोत्तम फळं जी ठेवतील फिट आणि उत्साही

Last Updated:

पुरूषांनी दैनंदिन आहारात फळे, पालेभाज्या, सोयाबीन, सलाड यांचा समावेश केल्यास अनेक आजारांना दूर ठेवता येऊ शकेल. अनेक फळं पुरूषांसाठी वरदान ठरू शकतात.

पुरूषांसाठी सर्वोत्तम फळं जी ठेवतील फिट आणि उत्साही
पुरूषांसाठी सर्वोत्तम फळं जी ठेवतील फिट आणि उत्साही
International men's day 2024: 19 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून ओळखला जातो. महिला दिनाप्रमाणेच हा दिवसही पुरुषांसाठी खास असतो. कुटुंब, समाज, देश आणि समाजातल्या पुरुषांच्या अभूतपूर्व योगदानाबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. ज्याप्रमाणे स्त्रिया घराची आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतात, त्याचप्रमाणे कुटुंब चालवण्याची जबाबदारी देखील घरातील पुरुषांच्या खांद्यावर असते. जर घरात एकच कर्ता पुरूष असेल त्याच्यावर किती मोठी जबाबदारी आणि मानसिक तणाव असेल याचा विचार करा. अशा परिस्थितीत पुरुषांनी त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.
मानसिक तणावामुळे पुरुषांचे आरोग्य कमी वयातच बिघडलेलं दिसतंय. 30-35 वर्षांच्या तरूणांना हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या अगदी सर्रासपणे ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे पुरूषांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज भासू लागली आहे. दैनंदिन आहारात फळे, पालेभाज्या, सोयाबीन, सलाड यांचा समावेश केल्यास अनेक आजारांना दूर ठेवता येऊ शकेल. कोणती फळं पुरूषांसाठी वरदान ठरू शकतात ते पाहुयात.
advertisement
निरोगी राहण्यासाठी खा हे पदार्थ
सफरचंद:  पुरुषांनीही दररोज सफरचंदांचे सेवन केले पाहिजे. सफरचंदांमधील फ्लेव्होनॉइड्स पुरूषांसाठी वरदान आहे. सफरचंद खाल्ल्याने पुरुषांमधील इरेक्टाइल डिसफंक्शनचा धोका 19 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. सफरचंदातलं उर्सोलिक एसिडची प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींना वाढू देत नाही. यामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
अंजीर: निरोगी आणि फिट राहण्यासाठी पुरुषांनी अंजीर खूपच फायदेशीर आहे. निरोगी खाणे आवश्यक आहे. यात फॅट्स किंवा कोलेस्टेरॉल नसतात. पाण्यात भिजवलेले अंजीर खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. अंजीरात कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, अ जीवनसत्व, क जीवनसत्व असतात. . अंजीर शुक्राणूंची संख्या वाढवते त्यामुळे लैंगिक आरोग्यही चांगलं राहतं.
advertisement
ॲव्हकॅडो: ॲव्हकॅडोमध्ये ई जीवनसत्व आणि झिंक भरपूर प्रमाणात असते, जे शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. लैंगिक आरोग्याला चालना देण्यासाठी पुरुषांनी एवोकॅडोचे सेवन नक्कीच केले पाहिजे.
पुरूषांनी आपल्या दैनंदिन आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश केल्यास त्यांचा जास्त फायद्याचं ठरू शकतं.क जीवनसत्वामुळे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढते जी विविध रोग आणि संसर्गांपासून रक्षण  करू शकते. ब्लॅकबेरीमध्ये जीवनसत्व के असते, जे प्रोस्टेट कॅन्सर आणि डोळ्यांच्या समस्यांपासून दूर ठेवते. तसेच, केळी, डाळिंब, बेरी खाल्यामुळे  पुरूषांना स्वतःला दररोज मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवता येतं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
International men's day 2024: पुरूषांसाठी सर्वोत्तम फळं जी ठेवतील फिट आणि उत्साही
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement