चेहऱ्यावर चट्टे येणं, डाग येणं यामुळे चेहरा कसा दिसतो यात फरक पडतो. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बरेच जण महागडे फेसवॉश आणि क्रीम वापरतात. पण यासाठी, तुमच्या घरात अगदी सहज उपलब्ध असलेल्या दोन गोष्टींचा उपयोग होऊ शकतो.
Diabetes : साखर, भात खाऊन मधुमेह होतो का ? मधुमेह होण्याची मूळ कारणं समजून घ्या
advertisement
डॉ. उपासना यांनी याबद्दल इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. फेस वॉशऐवजी दही आणि खोबरेल तेल वापरल्यानं त्वचा निरोगी राहू शकते. फेसवॉशऐवजी दही वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. थोड्या दह्यानं चेहरा धुवा. यामुळे डाग दूर होण्यास मदत होऊ शकते. चवीप्रमाणेच, सौंदर्य वाढवण्यासाठी दह्याचा वापर अनेक प्रकारे करता येतो.
Health Care : मानसिक ताणाचा शरीरावर परिणाम कसा होतो ? वाचा आयुर्वेदिक टिप्स
दह्यामधे असलेलं लॅक्टिक ॲसिड त्वचेला एक्सफोलिएट करतं, यामुळे मृत त्वचा काढून टाकली जाते आणि मॉइश्चरायझ करते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते.
चेहरा चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी, झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्याला नारळाचं तेल लावा. दररोज चेहऱ्याला नारळाचं तेल लावल्यानं त्वचेला खोलवर मॉइश्चरायझेशन मिळतं, कोरडेपणा कमी होतो, काळे डाग आणि सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्यावरचं तेज वाढतं. काही जण नारळाचं तेल आणि दही, डाळीचं पीठ असं मिश्रणही चेहऱ्यावर लावतात.
