डोळ्यांभोवती पिवळसर गाठी
डोळ्यांच्या पापण्यांवर किंवा कडांवर पिवळसर रंगाचे छोटे, मऊ डाग किंवा गाठी दिसणे हे उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमुख लक्षण आहे. याला वैद्यकीय भाषेत 'झँथेलाझ्मा' म्हणतात. हे डाग वेदनादायक नसतात, पण हृदयाच्या धोक्याचा स्पष्ट संकेत देतात.
हात-पायांवर चरबीचे ढेकळे
कोपर, गुडघे, हात आणि पायांच्या सांध्यांवर किंवा बोटांवर मेणासारखे, पिवळसर रंगाचे मोठे किंवा छोटे ढेकळे दिसणे. याला 'झँथोमा' म्हणतात. हे त्वचेखाली अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे तयार होतात.
advertisement
त्वचेवर खाज आणि जळजळ
कारण नसताना त्वचेवर वारंवार खाज सुटणे, जळजळ होणे किंवा लालसरपणा दिसणे हे उच्च कोलेस्ट्रॉलमुळे होऊ शकते. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे त्वचेच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे ही लक्षणे दिसतात.
पाय नेहमी थंड राहणे आणि जखमा उशिरा भरणे
जर उष्ण वातावरणातही तुमचे पाय नेहमी थंड वाटत असतील किंवा पायाला झालेली एखादी जखम बरी होण्यास बराच वेळ लागत असेल, तर हे रक्ताभिसरण बिघडल्याचे लक्षण आहे. कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात.
नखांचा आणि त्वचेचा रंग बदलणे
पायांच्या बोटांच्या त्वचेचा रंग निळसर किंवा जांभळसर दिसणे. तसेच, नखे फिकट होणे, हे सूचित करते की त्या भागांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाहीये. हे लक्षण 'पेरिफेरल आर्टरी डिसीज' मुळे असू शकते, जे उच्च कोलेस्ट्रॉलमुळे होते.
बुबुळाभोवती करड्या-पांढऱ्या रंगाचे वलय
डोळ्यातील बुबुळाच्या बाहेरच्या बाजूला करड्या किंवा पांढऱ्या रंगाचे वलय दिसणे. हे वलय चरबी जमा झाल्यामुळे तयार होते. वृद्धांमध्ये हे सामान्य असले तरी, 40 वर्षांपूर्वी हे लक्षण दिसल्यास ते उच्च कोलेस्ट्रॉलचे स्पष्ट संकेत असू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)