अमरावती : सध्या लग्नसराईचा सिझन सुरू आहे. त्याचबरोबर मकर संक्रांती सुद्धा तोंडावर आली आहे. त्यामुळे महिलांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. अमरावतीमध्ये महिलांच्या खरेदीसाठी बेस्ट ऑप्शन असू शकतं अंबादेवी मार्केट. महिलांची नववारी, मुलींचे परकर पोलके, छोट्या मुलांचे कुर्ता पैजामा, संक्रांतीच्या साडीवर मॅचिंग बटवा त्याचबरोबर संक्रांतीच्या सजावटीसाठी अनेक गोष्टींची खरेदी सध्या महिला करत आहेत. मात्र संपूर्ण मार्केट फिरून आल्यानंतरही ही सर्व खरेदी होत नाही. अमरावतीमधील महिलांना जर सर्व खरेदी एकाच ठिकाणी करायची असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतं ते म्हणजे गांधी चौक येथील अंबा स्टोअर्स. या ठिकाणी तुम्हाला संक्रांतीला लागत असणारे सर्व सजावट साहित्य, महिलांसाठी, मुलांसाठी कपडे, पर्स, बटवा, हलव्याचे दागिने हे सर्व उपलब्ध आहेत.
advertisement
अंबा स्टोअर्सचे मालक निमिश दामानी लोकल18 शी बोलताना सांगतात की, आम्ही गेले कित्येक वर्ष हँडीक्राफ्टचा व्यवसाय करत आहोत. लग्नसराईमध्ये दिलेले ऑर्डर सुद्धा आम्ही घेतो. आमच्याकडे महिला आणि मुलींसाठी नववारी, मुलांसाठी कुर्ता पैजामा, बटवा, मोबाईल पर्स, सजावटी साठी वेगवेगळ्या प्रकारच्या माळ, प्रत्येक सणावाराला विशेष ड्रेसेस आमच्या कडे विक्रीसाठी असतात. त्याचबरोबर आम्ही ऑर्डर सुद्धा घेतो.
स्टायलिश वन पीस, खरेदी करा फक्त 220 रुपयांपासून, वांद्रेतील स्वस्त मस्त मार्केटमध्ये, Video
सध्या मकरसंक्रांतीसाठी अनेक वस्तू आमच्याकडे उपलब्ध आहेत. महिलांना संक्रांतीसाठी साडीवर शोभेल असे अनेक प्रकारचे बटवे आणि पर्स आमच्याकडे 60 रुपयांपासून उपलब्ध आहेत. राजस्थानी पॅटर्नमधील चिड मोतीचे बटवे सध्या खूप ट्रेंडिंग आहेत. ज्याला मोत्याचे वर्क आणि वेलवेटचा कापड असतो. हे तुम्हाला 100 रुपये 150 ते 250 रुपयांच्या रेंजमध्ये मिळेल. साईजनुसार या रेंजमध्ये फरक पडतो.
त्यानंतर मोबाईल पर्स ही तुम्हाला 90 रुपयांपासून मिळेल. हळदी कुंकवाचे वान म्हणून द्यायचे असल्यास हे तुम्हाला 900 रुपये डझन या दराने मिळेल. त्यानंतर कॉटन बटवे 60 रुपयांपासून मिळेल. 60 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतचे बटवे आणि पर्स आमच्याकडे उपलब्ध आहेत.
कॅनव्हास आणि टोट बॅग होलसेल दरात, 30 रुपयांपसून करा खरेदी, मुंबईत एवढ्या स्वस्तात कुठंच नाहीत!
त्यानंतर हलव्याच्या दागिन्यांचे सेट देखील उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी 300 ते 350 रुपयांना सेट मिळेल. महिलांसाठी 450 ते 500 रुपयांपर्यंत सेट उपलब्ध आहेत. हळदी कुंकवाला सजावट करायची असल्यास लागणारे स्टॅच्यू देखील आमच्याकडे रेंटने मिळतात. त्याला दिवसभराचे रेंट आम्ही स्टॅच्यू नुसार घेतो. बाकी इतर सर्व साहित्य आमच्याकडे होलसेल भावात विक्रीसाठी आहे, असे निमीश दामानी यांनी सांगितले.





