TRENDING:

लग्नानंतर गावात लागलं 144 कलम, चळवळीतील कार्यकर्त्यांची सिनेस्टाईल लव्ह स्टोरी

Last Updated:

मंगल खिवसरा आणि शांताराम पंदेरे यांनी जात धर्म न बघता एकमेकांवर नि:स्वार्थी पणाने प्रेम केल्याने आज दोघांचाही सुखाचा संसार सुरु आहे. त्यांची प्रेम कहाणी चळवळीमध्ये सुरु झाली होती. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी 
advertisement

छत्रपती संभाजीनगर : प्रेम करताना कोणती व्यक्ती जात धर्म बघून प्रेम करत नाही. प्रेम करताना फक्त समोरच्या व्यक्तीचे मन बघून आणि निस्वार्थ भावनेने एकमेकांनावर प्रेम करतात. छत्रपती संभाजीनगरमधील मंगल खिवसरा आणि शांताराम पंदेरे यांनी जात धर्म न बघता एकमेकांवर नि:स्वार्थी पणाने प्रेम केल्याने आज दोघांचाही सुखाचा संसार सुरु आहे. त्यांची प्रेम कहाणी चळवळीमध्ये सुरु झाली होती.

advertisement

अशी झाली पहिली भेट 

मंगल या मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीम या गावच्या आहेत. मंगल यांच्या घरात एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे त्यांना बहिण आणि भाऊ मिळून ते 10 भावंडे आहेत. मंगल यांचे वडील हे अडत व्यापारी होते. मंगला यांनी पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेतून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी कर्जत येथे प्री डिग्री आर्ट पर्यंतचे शिक्षण सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संशोधन पूर्ण केलं. 1972 मध्ये त्यांच्या गावामध्ये युवक क्रांती दलाची चळवळ सुरू होते. या चळवळीमध्ये शांताराम आणि मंगल यांची पहिली भेट झाली.

advertisement

Happy Valentine Day 2024 : सुंदर मेसेजेसद्वारे प्रिय व्यक्तीला द्या व्हॅलेन्टाईन्स डेच्या 'या' खास शुभेच्छा!

...आणि लग्नासाठी होकार दिला

चळवळी दरम्यान भेट झाली आणि भेटीगाठी वाढत गेल्या. मंगल यांना शांताराम हे आवडू लागले. त्यानंतर मला तुला बोलायचं आहे असा निरोप मंगल यांनी शांताराम यांना पाठवला. आणि ठरलेल्या ठिकाणी त्यांची भेट झाली. ते त्यांच्या एका मैत्रिणीच्या घरी भेटले होते. तिथे गेल्यानंतर मंगल यांनी शांताराम यांना लग्नाचा प्रस्ताव दिला आणि आत्ताच हो किंवा नाही असं सांगायला सांगितले. हे ऐकून शांताराम एकदम विचारात पडले त्यांना काय बोलावं काही सूचेना. मंगल यांनी शांताराम यांना हो म्हूणन सांग असे सांगितले. त्यांनी थोडा विचार केला आणि नंतर त्यांना लग्नासाठी होकार दिला, असं शांताराम सांगतात. त्यानंतर काय काही काळ ते दोघे अशीच एकमेकांना भेटत होते. जेव्हा लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा मंगल यांनी 1 एप्रिल 1978 रोजी घर सोडले आणि बीड या ठिकाणी जाऊन दोघांनी लग्न केलं.

advertisement

यंदाच्या 'व्हॅलेंटाईन डे'ला मीट युअर मॅच, मुक्या जीवांवर करा भरभरून प्रेम, Video

एप्रिल फुल बनवून केलं लग्न केलं

मंगल सांगतात की, आपल्याकडे 1 एप्रिल म्हणाल तर एप्रिल फुल म्हणून साजरा करतो. तसेच मी माझ्या घरच्यांना एप्रिल फुल बनवून लग्न केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले यांनी आमचं लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर आम्ही काही काळ बीडमध्येच राहिलो. आणि त्या याचं दरम्यान गावामध्ये मी पळून गेली म्हणून भांडण सुरू झाली. युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांना गावकऱ्यांनी मारलं त्यांना त्रास दिला. गावात तणाव निर्माण झाला आणि यासाठीच गावमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कलम 144 लागू झालं. त्यानंतर मी गावकऱ्यांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रात मी असं लिहिलं होतं की मी माझ्या स्वेच्छेने लग्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणीही याचा बाऊ करू नये, असं त्या सांगतात.

advertisement

खरंच प्रेम आंधळं असतं! जोडीदाराची दृष्टी जाणार हे माहिती असूनही केलं लग्न, आता.., Video

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

काही काळ बीडमध्ये राहिल्यानंतर मंगल आणि शांताराम छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाले. इथे आल्यानंतर मंगल यांनी त्यांचं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी नोकरी देखील केली. आणि शांताराम त्यांचा चळवळीचं काम चालू होतं. सध्याला त्यांना एक मुलगी आहे ती अमेरिकेत आहे. आज मंगल आणि शांताराम यांचा संसार सुखाचा चालू आहे.

मराठी बातम्या/लव स्टोरी/
लग्नानंतर गावात लागलं 144 कलम, चळवळीतील कार्यकर्त्यांची सिनेस्टाईल लव्ह स्टोरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल