नोकरी आणि व्यवसायानिमित्त आपल्या मूळ गावापासून दूर राहणारे लोक सणासुदीच्या काळात आपापल्या गावी जातात. त्यामुळे सणाच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढते. गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Railway Update: मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, 6 गाड्या उशीराने धावणार, बघा वेळापत्रक
कोल्हापूर-कलबुर्गी विशेष ट्रेन: 24 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत शुक्रवार वगळता ही गाडी दररोज सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी कोल्हापूर येथून निघणार असून त्याच दिवशी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी कलबुर्गी येथे पोहोचेल. तर कलबुर्गी येथून हीच गाडी शुक्रवार वगळता दररोज संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल.
advertisement
ही गाडी हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, अरग, बेलांकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, मसोबा, डोंगरगाव, जवळे, वासुद, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डुवाडी आणि सोलापूर स्टेशनवर थांबणार आहे.