Railway Update: मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, 6 गाड्या उशीराने धावणार, बघा वेळापत्रक
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Railway Update: नांदेड विभागातून धावणाऱ्या तब्बल सहा गाड्या 15 मिनिटे ते 1 तास 50 मिनिटे उशिराने धावणार आहेत.
जालना: मराठवाड्यातून रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नांदेड विभागातून धावणाऱ्या तब्बल सहा गाड्या 15 मिनिटे ते 1 तास 50 मिनिटे उशिराने धावणार आहेत. नांदेड विभागात विविध ठिकाणी टी-28 मशीनद्वारे खोल स्क्रीनिंग व महत्त्वाच्या क्रॉसओव्हर कनेक्शनच्या कामांसाठी 3 तासांचे ट्रॅफिक ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. 9 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान हा ब्लॉक असल्यामुळे प्रवासाचा अवधी वाढणार आहे. त्यानुसार नियोजन करूनच प्रवाशांना घराबाहेर पडावे लागणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 17687 मराठवाडा-धर्माबाद-मराठवाडा एक्सप्रेस 9, 10 व 11 सप्टेंबर रोजी दौलताबाद स्थानकावर 60 मिनिटे थांबवण्यात आली. शनिवारी (13 सप्टेंबर) गाडी क्रमांक 17617 मुंबई ते हुजूरसाहिब नांदेड-तपोवन एक्सप्रेस रांजणी स्थानकावर 110 मिनिटे थांबवण्यात आली. गाडी क्रमांक 12788 नागरसोल ते नरसापूर एक्सप्रेस कोडी येथे 60 मिनिटे थांबवली गेली.
advertisement
गाडी क्रमांक 17661 काचिगुडा-नागरसोल ही गाडी 15 सप्टेंबर रोजी मालटेकडी स्थानकावर 40 मिनिटे थांबवली जाणार आहे. 17 व 18 सप्टेंबर रोजी लिंबगाव स्थानकात 80 मिनिटे तर 20 सप्टेंबर रोजी मालटेकडीत 30 मिनिटे थांबवली जाणार आहे.
advertisement
गाडी क्रमांक 17409 आदिलाबाद-हुजूरसाहिब नांदेड एक्सप्रेस ही गाडी 15 सप्टेंबर रोजी मालटेकडी स्टेशनवर 80 मिनिटे थांबवली जाणार आहे.
गाडी क्रमांक 17641 काचिगुडा-नरखेड एक्सप्रेस ही गाडी 17 व 18 सप्टेंबर रोजी लिंबगाव स्टेशनवर 40 मिनिटे थांबणार आहे. हीच गाडी 24, 25 व 26 सप्टेंबर रोजी बोल्डा स्टेशनवर 30 मिनिटे थांबवली जाणार आहे.
advertisement
गाडी क्रमांक 17641 काचिगुडा-नरखेड एक्सप्रेस 28, 30 सप्टेंबर आणि 1, 3, 5, 7, 8 व 10 ऑक्टोबर रोजी मसूल स्टेशनवर 15 मिनिटे थांबवली जाणार आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 14, 2025 12:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Railway Update: मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, 6 गाड्या उशीराने धावणार, बघा वेळापत्रक